Home
तांदूळवाडी येथे आयुष्यमान भारत कार्ड योजनेच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद… पहिल्याच दिवशी 1000 हुन अधिक नागरिकांनी दिली शिबिरास भेट…
प्रतिनिधी – माजी केंद्रीय कृषिमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तांदूळवाडी व परिसरातील नागरिकांसाठी आज गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर व शुक्रवार 1 डिसेंबर रोजी 2 दिवसीय आयुष्यमान भारत कार्ड योजनेचे शिबिर बेलदार पाटील चौक तांदूळवाडी बारामती येथे आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी 500 […]
राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाने अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करावेत
प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे […]
मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाबद्दल काकडे महाविद्यालयाचा उच्च शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते गौरव.
प्रतिनिधी सोमेश्वरनगर: केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या विशेष उपक्रमामध्ये येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाने केलेल्या विशेष कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील व महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. महाविद्यालयाने दि. […]
ओतूर परिसरात शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका तर डिंगोरेत घरावर विज कोसळली
प्रतिनिधी ओतूर ता.जुन्नर व परीसरातील गावामध्ये रविवारी रात्री अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साठून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर डिंगोरे येथे अवकाळी पाऊस सुरू असताना रात्री घरावर विज कोसळली सुदैवाने कोणतीही जीवित हानीझालीनाही.ओतूर,उदापूर,डिंगोरे,नेतवड,माळवाडी,बल्लाळवाडी,पिंपळगाव,जोगा,कोळवाडी,वाटखळे,सितेवाडी,मढ,पारगाव,खूबी,करंजाळे,खिरेश्वर,सांगनोरे,कोपरे,मांडवे,मुथाळणे चिल्हेवाडी,आंबेगव्हाण,रोहोकडी व परीसरातील गावामध्ये काही ठिकाणी रविवारी दुपारी तर काही भागात रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात वीजासह ढगांच्या गडगडाटासह वादळी वारा […]
चालकाला रुग्णवाहिकेतून खाली खेचलं, बांबूने मारलं, मग चाकूने… डी. वाय. पाटील रुग्णालयासमोरील धक्कादायक घटना
प्रतिनिधी नेरुळ येथे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका चालकाला चौघांनी गाडीतून खाली खेचून बाहेर काढले. एवढ्यावरच न थांबता त्याला बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. रुग्णवाहिका चालक हा डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या परिसरात रुग्णवाहिका पार्क करत असताना ही घटना घडली आहे. रुग्णवाहिका चालक पूर्ण घायाळ होताच चालकाच्या मानेत […]
निंबुत ग्रामपंचायत येथे संविधान दिन साजरा.
प्रतिनिधी. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो त्याच अनुषंगाने आज निंबूत ग्रामपंचायत येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत निंबूतचे उपसरपंच अमरजीत चंद्रशेखर काकडे. सदस्य. प्रमोद बाबासो बनसोडे नंदकुमार छबनराव काकडे. क्लार्क भाऊसो कोळेकर. आधी सदस्य ग्रामस्थ कर्मचारी वृंद ग्रामसेवक काळभोर आदी उपस्थित होते. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
स्तुत्य उपक्रम ! गेले पंधरा वर्षे ‘एक झाड’ संकल्पना ठेवत गोलांडे आपला लग्नाचा वाढदिवस करतात साजरा
प्रतिनिधी सोमेश्वरनगर – सध्या तरूणाईमध्ये लग्नाचा किंवा स्वतः च्या वाढदिवसची मोठी क्रेझ आहे. वाढदिवस आला रे आला की सोशल मिडीयावर वेगवेगळे स्टेटस टाकणे, डिजीटल बॅनर लावणे त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्टी करणे धांगडधिंगा करणे हे आता नित्याचे झाले आहे. परंतु सामाजिक उत्तरदायित्वाची जाणिव काही तरूण वाढदिवसाचे औचित्य साधुन सामाजिक उपक्रम राबवत असतात. असा एक उपक्रम सोमेश्वर-करंजे […]
‘बारामती पॉवर मॅरेथॉन’च्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल*
प्रतिनिधी. बारामती, दि. २५: बारामती स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे २६ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’ स्पर्धेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजल्यापासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत शहर […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
प्रतिनिधी. सातारा दि. २५ :- राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी […]
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*
प्रतिनिधी. पुणे, दि. २४: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाकडील स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजनांच्या लाभासाठी https://www.msobcfdc.org किंवा https://msobcfdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गांतील व्यक्तींसाठी २० टक्के बीज भांडवल कर्ज, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा, कौशल्य […]