संपादक- मधुकर बनसोडे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये एका वरच्या पदावरती असलेल्या अधिकाऱ्याने सोमेश्वर कारखान्यातीलच एका ठेकेदाराला हाताला धरून महिन्याकाठी दीड ते दोन लाख रुपये चा गपला करत असल्याची चर्चा सध्या सोमेश्वर कारखान्याच्या पंचक्रोशी मध्ये होऊ लागली आहे. उद्या 27 तारखेला संचालक मंडळाची मासिक मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे या मासिक मीटिंगमध्ये देखील या गपला करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यासंदर्भात चर्चा होईल अशी देखील माहिती खात्रीला एक सूत्रांकडून मिळत आहे. जवळपास 50 ते 70 लाख रुपयांचा आतापर्यंत या ठेकेदाराने व अधिकार्याने गपला केल्याचे सूत्रंकडून समजते. सदर विषयी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कानावरती गेला असून संबंधित दोशी असणाऱ्या अधिकाऱ्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत? अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नक्की काय होणार या अधिकार्याचे व ठेकेदाराचे हे उद्याच्या मीटिंगमध्ये नक्कीच समजेल मात्र या अधिकाऱ्याच्या पाठीशी आणि कोणाचा वरद हस्त आहे का हे देखील पाहणं तितकच गरजेचं आहे.