Home

1 min read

बारामती शहरामध्ये बेकायदेशीरपणे शरीरास घातक इंजेक्शन विकणाऱ्या इसमास अटक

प्रतिनिधी ता. १९/९/२०२३ रोजी बारामती शहरामध्ये पोलीसांकडून पेट्रोलिंग चालू असताना पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, अविनाश शिवाजी शिंदे रा. पिंपळी ता. बारामती जि.पुणे याने आपलेकडे काही मिफेनटरमीन ( ) हे मानवी शरीरास घातक इंजेक्शन जवळ बाळगले आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे […]

1 min read

गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून बारामती शहरातील चार गुन्हेगारांना केले तडीपार

प्रतिनिधी आगामी गणेश उत्सव, नवरात्री हे सन शांततेत पार पाडण्यासाठी बारामती शहर पोलीसांनी बारामती शहरातील रेकॉर्ड वरील गुन्हे गार तसेच सार्वजनिक शांतता भंग करणारे उपद्रवी यांची यादी तयार केलेली असून त्यांचे विरूद्ध मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे नियोजन बारामती शहर पोलीसांनी आखलेले असून असे काही उपद्रवी इसम असतील त्यांची नावे सुद्धा पोलीस स्टेशनला कळविण्यात वावत पोलीसांनी […]

1 min read

जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन शासन निर्णय निर्गमित

 प्रतिनिधी मुंबई, दि. २२ : राज्यात चालू वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या पीक पाहणी आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारा टंचाईवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दुष्काळी परिस्थितीत जलाशयाखालील आणि तलावाखालील जमिनीचा विनियोग फक्त चारा […]

1 min read

*घरपट्टे मिळण्यापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – ना. सुधीर मुनगंटीवार*

प्रतिनिधी मूल येथे 116 लाभार्थ्यांना घराचे पट्टे वाटप चंद्रपूर,  अनेक वर्षांपासून शासकीय जमिनीवर वास्तव्य असलेल्या कुटुंबाना घरपट्टे देऊन नियमानुकूल करणे, हे शासनाचे धोरण आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत घरपट्टे वाटपाचा श्रीगणेशा आज (दि.21) मूल येथून करण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वत्र ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या असून कोणताही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही […]

1 min read

*कोतवाल पद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न*

बारामती, दि.२१ : कोतवाल भरती निवड समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे असलेल्या सजांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथे संपन्न झाला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदे भरण्याचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. त्यानुसार तालुक्यात एकूण १८ गावातील […]

1 min read

*मु. सा. काकडे महाविद्यालयात ‘विविध स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन*

प्रतिनिधी *सोमेश्वरनगर :* येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून परिसरातील निंबुत गावचे सुपुत्र व नुकत्याच एमपीएससी परीक्षेमध्ये टाऊन प्लॅनिंग ऑफिसर या पदासाठीच्या परीक्षेत यश संपादन केलेले श्री. अमरजीत सतीश लकडे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना वेळेचे उत्तम […]

1 min read

इम्रान तांबोळीला सर्वोत्कृष्ट अभिनेता नैपुण्य हे पारितोषिक प्रदान.

प्रतिनिधी – फिरोज भालदार विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणजेच बारामतीचा अभिनेता इम्रान तांबोळीला गेल्या ५८ वर्ष चालू असलेली स्पर्धा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाऊसपाड्या या एकांकिकेत पाऊस पाड्या या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता नैपुण्य हे पारितोषिक त्याने मिळवलं आहे. याआधी इम्रानने गेट टू गेदर सिनेमा मधे प्रमुख भूमीका केली आहे तसेच. यापूर्वी त्याने […]

1 min read

नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

प्रतिनिधी महिला व बाल विकास विभागातर्फे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह म्हणून ‘सखी निवास’ ही योजना राबविण्यात येत असून पुणे जिल्ह्यात भाडे तत्वावरील इमारतीमध्ये सखी योजना राबविण्यासाटी इच्छुक संस्थांकडून ७ दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती, केंद्र शासनाच्या मिशन शक्ती या एकछत्रीत योजनेच्या मार्गदर्शक सूचना, योजनेच्या […]

1 min read

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांसाठी ‘आयुष्मान भव:

प्रतिनिधी ग्रामस्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला आहे. आयुष्मान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्मान मेळावा अंतर्गत विविध तपासण्या व उपचार, रक्तदान मोहीम, १८ वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, अवयवदान जनजागृती, आयुष्मान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी व्यापक स्वरुपात ३१ डिसेंबर […]

1 min read

जिल्ह्यात ‘आनंदाचा शिधा’चे ७३ टक्के वितरण*

प्रतिनिधी पुणे, दि. २०: शासनाच्या पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींच्या पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी-गणपती निमित्त चार शिधा जिन्नस असलेला आनंदाचा शिधा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वितरीत करण्यात येत असून पुणे जिल्ह्यात आज अखेर ७३ टक्के आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे. प्रती शिधापत्रिका १ संच ज्यामध्ये १ किलो […]