प्रतिनिधी – फिरोज भालदार
विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणजेच बारामतीचा अभिनेता इम्रान तांबोळीला गेल्या ५८ वर्ष चालू असलेली स्पर्धा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाऊसपाड्या या एकांकिकेत पाऊस पाड्या या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता नैपुण्य हे पारितोषिक त्याने मिळवलं आहे.
याआधी इम्रानने गेट टू गेदर सिनेमा मधे प्रमुख भूमीका केली आहे तसेच. यापूर्वी त्याने बऱ्याच एकांकिकेत प्रमुख भूमिका केल्या आहेत, लवकरच इम्रान आपल्याला हिंदी वेब सिरीज मधे दिसेल त्यामध्ये सुद्धा लीड रोल म्हणजेच प्रमुख भूमिकेत आपल्याला इम्रान दिसणार आहे, आणि लवकरच नवीन प्रोजेक्ट ही सुरु होतील अशी माहिती इम्रान च्या वतीने देण्यात आली आहे.
भरत नाट्यमंदिर येथे पार पडलेली पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने,जेष्ठ रंगकर्मी व एशिया पॅसिफिक ऑफ इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्युट चे आयटीआययुनेस्को चे उपाध्यक्ष विद्यानिधी वनारसे म्हणजे प्रसाद वनारसे यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य पुरुष पारितोषिक हे बारामतीतील अभिनेता इम्रान तांबोळी ने पटकावला आहे .
इम्रान ला सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळाल्याबद्दल विविध भागातून सत्कार सत्कार व शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे .