प्रतिनिधी –
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 233 व्या जयंतीच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षिस वितरण आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आले. सदर हस्ताक्षर स्पर्धेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक व दोन या शाळेतील ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . यामधून १६ विद्यार्थ्यांचा ट्रॉफी आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
खालील विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर स्पर्धेची बक्षीस पटकावली.
इयत्ता पहिली मधील – राजवीर आनंदा खोमणे,ओवी सुजित हिरवे,शौर्य शेखर खोमणे आणि संस्कृती उमेश शिंदे
इयत्ता दुसरी मधील- आयुष दिपक हिरवे,ओंकार प्रमोद कांबळे,रिफा इकबाल आतार,स्नेहा सचिन दरेकर
इयत्ता तिसरी मधील – सार्थक पांडुरंग शिंदे,अथर्व दत्तात्रय पवार,अनुष्का सागर गवळी,पवित्रा संदीप राजेनिंबाळकर
इयत्ता चौथी मधील – आकिब सुलतान आतार,विराज महेश शितोळे,वैष्णवी पांडुरंग हिरवे आणि समीक्षा महेश राऊत या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन स्पर्धेची बक्षीस पटकावली .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती वनविभागाचे वनपालअधिकारी जी.एस.शेख साहेब,वनरक्षक माया काळे मॅडम,माजी सरपंच संजय साळवे, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल खोमणे,भाजपा बारामती तालुका उपाध्यक्ष सुनिल माने,सामाजिक कार्यकर्ते विनोद दरेकर,पत्रकार सुनिल जाधव,ग्रामपंचायत सदस्य अजित भोसले,सल्लागार शिवाजी खोमणे, दत्तात्रय खोमणे,दिलीप भंडलकर,व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल जाधव,समीर आतार,शुभांगी साळवे,शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,मालन बोडरे,राणी ताकवले,लता लोणकर,रूपाली जाधव आणि गावातील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिंतामणी क्षिरसागर,तर आभार सुनिल खोमणे आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गवळी यांनी केले.