Home
पोस्टमन आणि ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन*
प्रतिनिधी बारामती, दि. 14: तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टमन आणि ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधींसाठी तहसील कार्यालय येथे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. तहसील कार्यालय व इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षणासत्रामध्ये ग्रामीण भागात इंडिया पोस्ट बँकेच्या माध्यमातून सहज व सुलभ सेवा देणे. ग्रामीण भागातील नागरिकांना पीएम किसान योजना, इंदिरा गांधी […]
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान )महाविद्यालयसोमेश्वर येथे 1990 च्या बॅच कडून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप.
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय सोमेश्वर नगर येथील एस.एस.सी १९९० बॅच च्या वतीने माजी विद्यार्थ्यांनी गरीब व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना मोफत ५१ गणवेश व शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी.इ.८वी) मार्गदर्शक ६० पुfस्तकांचा संच भेट देण्यात आला. तसेच श्री. सुभेदार कांबळे यांनी गरजू व गरीब शालेय ११ विद्यार्थ्यांना गणवेश दिले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. अभिजीत केंजळे […]
स्वातंत्र्यसंग्राम काळातील दुर्मिळ छायाचित्रांचे कवठेमहांकाळ येथे मल्टिमिडीया प्रदर्शन
प्रतिनिधी केंद्रीय संचार ब्यूरोचा “मेरी माटी मेरा देश” अभियानानिमित विशेष उपक्रम तरुणाईसाठी VR गॉगल्स; आणि डिजिटल पझल्सचे खास आकर्षण फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त विशेष श्रद्धांजली कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता कार्यक्रम, मेरी माटी मेरा देश (माझी माती माझा देश) आणि फाळणी वेदना स्मृती दिवसानिमित माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, कोल्हापूर आणि कवठेमहांकाळ तहसीलदार […]
बारामती ! वडगाव निंबाळकर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृतिदिनानिमित्त मौर्य क्रांती महासंघ व वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी – फिरोज भालदार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त व मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमाच्या अंतर्गत वडगाव निंबाळकर बौद्ध विहार मरिमाता मंदिर येथे दि. १३/८/२०२३ रोजी मौर्य क्रांती महासंघ बारामती तालुका व वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला […]
एनडीए चौकातील रस्ते विकास प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण
प्रतिनिधी पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार-नितीन गडकरी पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात ५० हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी […]
शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव […]
संत निरंकारी मिशन करणार ‘वननेस वन’ प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ
प्रतिनिधी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांचे – ‘प्रदूषण आतील असो वा बाहेरील दोन्ही हानीकारक आहेत’ हे दिव्य उद्गार निरंकारी मिशनकडून मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक व धर्मार्थ उपक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी एक प्रेरणास्रोत म्हणून उपयोगात आणले जात आहेत. या कल्याणकारी उपक्रमांमध्ये बहुधा वृक्षारोपण मोहीम, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, जलसंधारण प्रकल्प, पर्यावरणविषयक […]
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुणे विभागस्तरीय पुरस्कार जाहीर सातारा जिल्ह्यातील बनवडी ग्रामपंचायतीला विभागात प्रथम
प्रतिनिधी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारुन ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षाचे विभागस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील बनवडी (ता.कराड) ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव […]
पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करावी यासाठी संपादक पत्रकार संघ बारामती आक्रमक …
प्रतिनिधी – राज्यात पत्रकारांसाठी संरक्षण कायदा लागू होऊन सुध्दा पत्रकारांवरील हल्ले काही थांबायला तयार नाहीत. याचे प्रत्येय नुकतेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून आ.किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे […]
‘हर घर तिरंगा २.०’ अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ध्वज टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध
प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित या वर्षीही ‘हर घर तिरंगा २.०’ अभियान राबविण्यात येत असून या अभियानाअंतर्गत नागरिकांना राष्ट्रीय ध्वज उपलब्ध होण्यासाठी नजीकच्या टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत, अशी माहिती बारामती डाक विभागाचे अधीक्षक दिलीप सर्जेराव यांनी दिली आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक यांच्या आठवणी, देशभक्तीची भावना जनमानसात कायम रुजावी या उद्देशाने गतवर्षी […]