बाळासाहेब कर्चे यांना २०२५ चा साईकला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर.

माझा जिल्हा

प्रतिनिधी- फिरोज भालदार

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव पुरस्कार बाळासाहेब कर्चे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार त्यांना जाहीर केल्या बद्दल त्यांनी सुदाम संसारे यांचे आभार मानले.या पुरस्कार सोहळ्याची २०२५ ची तयारी पूर्ण झाली आहे.

हा साईकला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा जागतिक दर्जाचे तीर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले बाबा च्या पदस्पर्शाने पावन व पवित्र भुमित शिर्डीत दिनांक १० जानेवारी वार शुक्रवार सकाळी १० वाजता हॉटेल शांती कमल शिर्डीत या पुरस्कार सोहळ्यास सुरुवात होणार असुन हा पुरस्कार सोहळा दुपारी ३ वाजेपर्यंत चालणार आहे.या भव्य व दिव्य राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळ्यास पुर्ण महाराष्ट्र राज्यातील व महाराष्ट्र राज्या बाहेरील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे कार्यक्रमाचे प्रमुख याकडून सांगण्यात आले .

 या कार्यक्रमाचे प्रसिद्ध प्रमुख मा.श्री. पांडुरंग गोरे सर आहेत. बाळासाहेब कर्चे यांना हा पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्याचं काम आम्ही केलं आहे अशी माहिती उपेक्षित नायक यांनी पत्रकारांशी बोलताना सुदाम संसारे सर यांनी दिली.