Home
शनिवारी राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी कै.वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पुणे जिल्हा परिषदेच्या श्री. शरदचंद्र पवार सभागृहात राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तसेच कृषि विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रगतीशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. […]
बारामती व इंदापूर तालुक्यातील ३४ गावातील पोलिस पाटील आरक्षण सोडत जाहीर
प्रतिनिधी बारामती उपविभागातील बारामती व इंदापूर तालुक्यातील रिक्त असलेल्या ३४ गावातील पोलीस पाटील पद भरतीचे गावनिहाय आरक्षण सोडतीच्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज नवीन प्रशासकीय भवनातील सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमास तहसिलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, नायब तहसिलदार पी. डी. शिंदे, उपविभागीय व तहसिल कार्यालयातील कर्मचारी, […]
बालकांच्या हक्कांविषयी जनतेला माहिती होणे गरजेचे-विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
प्रतिनिधी बालकांच्या सुरक्षिततेशिवाय मानवी विकास पूर्ण हेाऊ शकत नाही. त्यामुळे बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), २०१२ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २००५ माहिती जनतेला होणे आवश्यक आहे. त्यासाठी या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी विविध माध्यमांद्वारे ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, त्यावर चर्चा घडवून आणावी, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. […]
बळीराजा तुझ्यासाठी..!*
प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना आषाढी एकादशी निमित्ताने त्यांनी पांडुरंगाचरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकऱ्यांसह सर्व घटकांना सुखी, समृद्धी करण्याचे साकडे घातले. बळीराजा संपन्न व्हावा, त्याची संकटे दूर व्हावीत हीच भावना शासनाची असल्याचे त्यातून दिसून आले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षभरात शासनाने तसे निर्णयही […]
निरा बारामती रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि अपघाताला आमंत्रण?
प्रतिनिधी निरा ते बारामती टू व्हीलर वरती प्रवासात भरपूर वाढ होत आहे. तालुक्याच्या ठिकाणी जायचे म्हणले तर टू व्हीलर चा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. रात्री अपरात्री टू व्हीलर वरती जात असताना मोकाट भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे या भटक्या कुत्र्यामुळे भरपूर अपघात झालेले आहेत. माणूस आणि कुत्रा पूर्वीपासूनच एकत्र राहिले आहेत कुत्रा आणि […]
बारामती व इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत ३० जून रोजी*
प्रतिनिधी बारामती दि. २९: बारामती उपविभागातील बारामती व इंदापूर तालुक्यातील रिक्त असलेल्या ३४ गावातील पोलीस पाटील पद भरतीचे गावनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नवीन प्रशासकीय भवनातील सभागृहात ३० जून रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे. बारामती तालुक्यातील १३ गावातील पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. त्यामध्ये बारामती तालुक्यातील निंबुत, सोनगाव, […]
मिरजच्या अपंग बालगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
प्रतिनिधी अपंग कल्याण आयुक्तालयांतर्गत शासकीय निवासी संस्था, मिरज येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या शाळेत मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव पुरविण्याची सुविधा देण्यात येते, असे शासकीय अपंग बालकगृह व व शाळेचे अधीक्षक यांनी कळविले आहे. संस्थेच्या परिसरात इयत्ता पहिले ते चौथी पर्यंतचे मोफत शिक्षण दिले जाते. […]
भोर व वेल्हे तालुक्यातील पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत ३० जून रोजी
प्रतिनिधी भोर उपविभागातील भोर व वेल्हे तालुक्यातील रिक्त असलेल्या १३२ गावातील पोलीस पाटील पद भरतीचे गावनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अभिजीत मंगल कार्यालय, महाड नाका, भोर येथे ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती भोरचे उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे. भोर तालुक्यातील ७२ गावातील पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. त्यामध्ये नांद, […]
वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन
प्रतिनिधी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, खडकवासला (जि. पुणे) या १०० मुलींच्या वसतिगृहासाठी सर्व सोयींनी युक्त इमारत भाड्याने घेण्यात येणार असून खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इमारतीचे क्षेत्रफळ साधारणपणे 10 हजार ते 12 हजार चौरस फूट असावे. इमारत खडकवासला मतदार संघात असावी. शासन नियमानुसार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने […]
सामान्य नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक देण्याची भारतीय युवा पँथर संघटनेची मागणी
प्रतिनिधी बारामती : भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांच्याकडे निवेदन देऊन सामान्य नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक द्या अशी मागणी केली आहे. पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी स्वतःच्या खाजगी कामासाठी पोलीस स्टेशनला येत नसतात त्यांच्याकडे नागरिक मदत मागण्यासाठी गेले […]