मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

शनिवारी राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन

mnewsmarathi 30 Jun 2023 1 मिनिट वाचन 9,753 वाचन

प्रतिनिधी

 कै.वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पुणे जिल्हा परिषदेच्या श्री. शरदचंद्र पवार सभागृहात राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तसेच कृषि विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रगतीशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi