Home

1 min read

जलसमृद्धी देणारे ‘जलयुक्त शिवार’ जनसहभागातून यशस्वी करावे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

प्रतिनिधी. सिंचन, कृषी उत्पादकता वाढीसह जलसमृद्धीसाठी उत्तम पर्याय असलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान जनसहभागातून व्यापक प्रमाणात यशस्वी करावे. तसेच येत्या काळात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सर्वंकष टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी […]

1 min read

शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार पंचनाम्यांच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी   मुंबई, दि. 24 : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात […]

1 min read

इतर मागासवर्गीय महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी एकरकमी परतावा योजना कार्यान्वित*

प्रतिनिधी , दि. २४: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास मागासवर्गीय महामंडळ पुणे यांच्यावतीने थकीत कर्ज प्रकरणात एकरकमी परतावा (ओटीएस) योजना राबविण्यात येत असून थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहणार असून महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा […]

1 min read

नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर*

प्रतिनिधी. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले. लोणावळा येथे होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या व निपुण भारत अंतर्गत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान परिषदेत शिक्षण विभागाने सर्व समावेशक बाबींचे सादरीकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

1 min read

पुरंदर तालुक्यातील सिंगापूरच्या शेतकऱ्याने अंजीर शेतीतून साधली प्रगती*

प्रतिनिधी. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी अग्रेसर आहे. या तालुक्यातील सिंगापूर या गावचे प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी ३० गुंठ्यांवरील अंजिराच्या शेतीतून १४ टन विक्रमी उत्पादन घेवून १० लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. त्यांना कृषि विभागाकडून शेततळ्याचा लाभ तसेच कृषिविषयक प्रशिक्षण मिळाले असून त्याचा त्यांना मोठा फायदा झाला आहे. अभिजित यांची […]

1 min read

संत निरंकारी मिशन द्वारे विश्वव्यापी रक्तदान अभियानाचे आयोजन

प्रतिनिधी मानवतेचे मसीहा बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण निरंकारी जगतात देश विदेशामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करत ‘मानव एकता दिवस’ या रूपात साजरा केला जातो. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मानव कल्याणार्थ संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन च्या माध्यमातून भारत देशातील मिशनच्या बहुसंख्य शाखांसह मिशनचे पुण्याचे मुख्यालय […]

1 min read

मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावेआरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या सूचना पुनर्रचित कोविड टास्क फोर्सची बैठक*

प्रतिनिधी मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या विशेष कार्यदलाच्या बैठकीत ते बोलत होते. पुनर्रचित टास्क फोर्स सदस्यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय […]

1 min read

महापुरूषांचे बॅनर फाडणाऱ्या खऱ्या आरोपींना वडगाव निंबाळकर पोलीसांनी केली अटक…

वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक १४/०४/२०२३ रोजी रात्री २:०० ते २:३० वा. चे सुमारास मौजे वडगाव निंबाळकर गावातील होळ चौकातील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लावलेले बॅनर हे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा फौजदार भालचंद्र साळुंखे यांनी दारू पिऊन बॅनरला दगडी मारून बॅनर फाडले असलेबाबत यातील फिर्यादी आकाश संजय साळवे रा […]

1 min read

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार* *सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार*

प्रतिनिधी. नवा आयोग नेमून मराठा समाजाचे विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करणार मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन .

वडगाव निं प्रतिनिधी- फिरोज भालदार आता सध्या रमजानचा महिना चालू आहे . मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना हा ओळखला जातो . यामध्ये मुस्लिम बांधव हे महिनाभर उपवास ठेवत असतात .हा उपवास ठेवण्याचा वेळ सकाळी साडेचार च्या आत मध्ये जेवायचे व ते दिवसभर न पाणी पिता न जेवता उपाशी राहणे व संध्याकाळी सात वाजता […]