आम आदमी पक्षाचे प्रमुख श्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय केस मध्ये सुप्रीम कोर्टा कडून नुकताच जामीन देण्यात आला.
त्यामुळे दिल्लीसह भारतभर सर्वत्र अरविंद केजरीवाल यांच्या सुटके संदर्भात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
राजगुरुनगर तालुक्यात आम आदमी पक्षाचे काम मोठे असून श्री. अरविंद केजरीवाल यांची विचारधारा मानणारे आणि आम आदमी पक्षाला मानणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे राजगुरुनगर येथील आम आदमी पक्षाचे वतीने शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११:३० वाजता हुतात्मा राजगुरूंच्या पुतळ्यासमोर श्री.अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेचा आनंद उत्सव फटाके वाजवून, एकमेकांना पेढे भरून, राजगुरूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, आणि घोषणाबाजी देऊन करण्यात आला.
या आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन आम आदमी पक्षाचे प्रदेश युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री. मयूर दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. खेड तालुक्यातील आम आदमी पक्षाचे असंख्य कार्यकर्ते त्यामध्ये सामील झाले होते.
अरविंदजी केजरीवाल आगे बढो हम तुम्हारे साथ है!, भारत माता की जय!, वंदे मातरम!, इन्कलाब जिंदाबाद!, अरविंद केजरीवाल संघर्ष करो हम तुम्हारे साथ है!, आम आदमी पक्षाचा विजय असो! यासारख्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून गेला होता.
आनंदउत्सव प्रसंगी बोलताना श्री.मयूर दौंडकर म्हणाले ” आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेने संपूर्ण भारतात चैतन्याचे वातावरण निर्माण झाला असून त्याला खेड तालुका ही अपवाद नाही. अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेमुळे विविध राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला ताकद मिळणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश संपादन होईल महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष उतरणार असून ताकतीने विधानसभा निवडणुका लढवणार आहे. खेड तालुक्यात सुद्धा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून आमआदमी पक्षाच्या वतीने खेड विधानसभेचे जागा पूर्ण ताकतीने लढुन विजय संपादन करण्यात निर्धार यावेळेस आमआदमी पक्षाचे प्रदेश युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री. मयूर दौंडकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संयोजन : श्री. मयूर दौंडकर, विठ्ठल परदेशी, भरतशेठ पवळे, दत्ताभाऊ ढेरंगे, नितीन सैद, बाळासाहेब तांबळे, इम्रान खान, प्रा. बाळासाहेब माशेरे, अभी भोसुरे, हनुमंतदौंडकरयांनी केले.
.