बारामती ! वडगाव निंबाळकरचे सरपंच सुनील दत्तात्रय ढोले यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गाव एक विकसित गाव म्हणून ओळखले जाते आणि हे गाव विकसित मागील १५ वर्षापासून जे कार्यकाळ पाहून सर्व श्रेय वडगाव निंबाळकर गावचे सरपंच सुनील ढोले यांना जाते . याचीच दखल घेत लोकराज्य न्युज मीडिया समुहातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार २०२४/२५ साठी राज्यातून तीन आदर्श सरपंच यांची निवड करण्यात आली यामध्ये वडगाव निंबाळकर गावचे विद्यमान सरपंच सुनील दत्तात्रय ढोले यांची निवड करण्यात आली .

हा पुरस्कार सोहळा दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी ‘एस फोर जी हॉटेल’ पुणे सोलापूर रोड, थेऊर फाटा येथे संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये विविध शेत्रातील ६५ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले . आपल्या क्षेत्रातील उत्कृष्ठ व चांगली कामगिरी केलेल्या सन्माननीय व्यक्तींचा त्यांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांना प्रोत्साहन देणे हाच या मागचा उद्देश आहे व यातून त्यांच्याकडून अजून चांगले कार्य घडावे हाच उद्देश राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचा आहे असे समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल कुंदनार यांनी व्यक्त केले.