Home

1 min read

तूप आणि लोणी यासारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीबाबत स्पष्टीकरण

प्रतिनिधी दुग्धव्यवसाय हे देशातील लाखो दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याची भारत सरकारला योग्य जाणीव असून, या व्यवसायाला आणखी बळकट करणे, हे  सरकारच्या सर्व योजना/कार्यक्रमांचे उद्दिष्ट आहे. तथापि, मुख्यतः, कोविड-19 महामारीनंतर पौष्टिक, सुरक्षित आणि आरोग्यदायी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्यामुळे डेअरी क्षेत्राच्या मागणी आणि पुरवठ्यात काही तफावत आढळून आली आहे, ही वस्तुस्थिती आहे. […]

1 min read

सोमेश्वरच्या कोपी वरील शाळेत278 विद्यार्थ्यांचा सहभाग.

ऊसतोडणी मजुरांसोबत कारखान्यावर अनेक मुले कधी फडात ऊस तोडताना, कधी कोप सांभाळताना तर कधी भावंड सांभाळताना दिसतात. सोमेश्वर कारखान्याने ही मुले शिक्षणातील प्रवाहापासून तुटू नयेत यासाठी ‘कोपीवरची शाळा’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमात चालू हंगामात ६ ते १८ वयोगटातील २७८ मुले सहभागी झाली होती. सलग पाच महिने दररोज सायंकाळी थेट कोप्यांवर जाऊन या मुलांना शिक्षण […]

1 min read

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा ५० शेतकऱ्यांना लाभ*

संपादक मधुकर बनसोडे पुणे, दि. ७: अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा २०२२-२३ या वर्षी पुणे जिल्ह्यातील ५० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून ५८ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने दिली आहे. आदिवासी उपयोजना […]

1 min read

सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन*

प्रतिनिधी *पियाजो कंपनीने घेतले १५० रुग्ण दत्तक* बारामती, दि.७: सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पियाजो कंपनीने क्षयरोगाचे उपचार सुरू असलेल्या १५० रुग्णांना दत्तक घेत त्यांना पोषण आहार किटचे वाटप केले. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पियाजो व्हेईकल कंपनीचे […]

1 min read

मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या तीन पीएच.डी संशोधन केंद्रांना मान्यता

प्रतिनिधी. सोमेश्वर नगर: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नामांकित असलेल्या महाविद्यालयांपैकी एक मु. सा. काकडे महाविद्यालयास मानव्यविज्ञान विद्याशाखेमधील इतिहास व मराठी तसेच वाणिज्य विद्याशाखेतील कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयातील पीएच.डी संशोधन केंद्रास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाली. या तीन संशोधन केंद्रांना मान्यता मिळाल्याने ग्रामीण भागातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे. या […]

1 min read

पुण्यात १२ एप्रिलला ‘रोजगार मेळावा’; दरमहा दुसऱ्या बुधवारी आयोजन*

प्रतिनिधी. पुणे, दि.६: नोकरी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने प्रत्येक महिन्याला रोजगार मेळावा अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०२३-२४ मधील पहिला रोजगार मेळावा येत्या १२ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. […]

1 min read

ऊस विकास कार्यक्रमांतर्गत बारामती उपविभागात शेतकऱ्यांना १४ लाख ९८ हजारांचे अनुदान*

प्रतिनिधी फिरोज भालदार बारामती दि. ६: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व्यापारी पिके अंतर्गत ऊस विकास कार्यक्रमात सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत बारामती कृषि उपविभागांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यात १७० हेक्टर क्षेत्रासाठी १४ लाख ९८ हजार ५५० रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी दिली […]

1 min read

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांच्यानियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

प्रतिनिधी पुणे दि.६: जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २८ अशासकीय सदस्यांची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार असून इच्छुक संस्थांचे प्रतिनिधी व व्यक्तींनी अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी ११ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे. ग्राहक संघटना प्रवर्ग १० आणि जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, […]

1 min read

लिलाव बंद होवून आता डेपोतूनच प्रती ब्रास वाळू ६०० रुपयांत मिळणार महसूल विभागाच्या निर्णयावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केल्याने ६०० रुपये प्रती ब्रास दरात वाळू उपलब्ध होणार आहे, तसेच यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येतील. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच ६०० रुपयात वाळू उपलब्ध होईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]

1 min read

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ३ हजार २७७ लाभार्थ्यांना लाभ*

प्रतिनिधी. पुणे, दि. ५: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष विभाग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा २०२२-२३ या वर्षात ३ हजार २७७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून एकूण अर्ज ३ हजार ६०० इतके प्राप्त झाले असल्याने उर्वरित लाभार्थ्यांना निधी प्राप्त होताच तात्काळ लाभ देण्यात येईल, असे समाज कल्याण पुणेच्या सहायक आयुक्त संगिता […]