• Home
  • माझा जिल्हा
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता केवळ अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी*
Image

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता केवळ अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी*

पुणे, दि.८:  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार असून याबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.

या योजनेंतर्गत माहे सप्टेंबर २०२४ मध्ये नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-सीआरपी ( एनयूएम, एमएसआरएलएम व माविम), मदत कक्ष प्रमुख, सीएमएम, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र अशा ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता  अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीबाबत देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे महिलांनी केवळ अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज सादर करावे, अशी माहिती श्रीमती रंधवे यांनी दिली.

Releated Posts

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026