Home

1 min read

आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

मोरगाव – प्रतिनिधी बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय शासकीय मैदानी स्पर्धेत आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले. विद्यालयातील गौरी नितीन कुतवळ हिने १७ वर्ष वयोगटातून उंच उडीत प्रथम तर १०० मीटर हर्डल्स प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. तर पायल गणेश मालक हिने उंच उडी या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. […]

1 min read

निंबूत येथील भैरवनाथ देवस्थान मंदिरास ब वर्ग दर्जा प्राप्त. सतीश राव काकडे यांच्या पाठपुराव्याला यश.

प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील निंबूत हे यात्रेच्या कुस्ती आखाड्यामुळे नेहमीच चर्चेत असते. या आखाड्यामध्ये दरवर्षी परराज्यातील मल्ल आपले नशीब आजमावण्याकरता येत असतात. याच निंबूत मधील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट साठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना ब वर्ग अंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यापूर्वी नींबूत येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यास क वर्ग […]

1 min read

एम न्यूज मराठी च्या दुसरा वर्धापन दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप . 

प्रतिनिधी – एम न्यूज मराठी या न्यूज पोर्टलचा द्वितीय वर्धापन दिन नींबूत येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व वही, पेन वाटप करून संपन्न झाला.   या कार्यक्रमाचे आयोजन एम न्यूज मराठी टीम च्या वतीने प्राथमिक शाळा नींबूत येथे 10.30 वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सतीशभैया काकडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक […]

1 min read

कौटुंबिक वादातून महिलेचा खून; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार

प्रतिनिधी कौटुंबिक वादातून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील शिंदे वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा खून केल्यानंतर सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार झाल्याचे उघडकीस आले आहे. आरती देबीलाल सरेन (वय ३२, सध्या रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती देबीलाल लक्ष्मणचंद्र सरेन […]

1 min read

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर बसला भीषण आग; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले

प्रतिनिधी जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर खाजगी बसला अचानक आग लागली. ही घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडलेली आहे. सुदैवाने बसमधील ३३ प्रवासी बचावले आहेत. त्यांना तातडीने बसच्या खाली उतरविण्यात आले. आय.आर.बी आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. परंतु, आगीत बस जळून खाक झाली आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.   बंगळुरूवरून जयपूरकडे जात असलेल्या […]

1 min read

शर्ट नीट न खोचल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी शर्ट नीट न खोचल्याने एका शाळेतील शिक्षकाने सहावीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रक्तबंबाळ झालेला विद्यार्थी घरी पोहोचल्यानंतर पालकांच्या लक्षात हा प्रकार आला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.संदेश भोसले (वय २६) असे गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वारगेट परिसरातील महर्षीनगर […]

1 min read

पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार

प्रतिनिधी कोंढवा भागातील बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर कोंढवा भागात पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी दहा, अकरा, तसेच तेरा वर्षाच्या मुलाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलाच्या पालकांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा […]

1 min read

काकडे महाविद्यालयात ‘विद्यार्थी सुरक्षा समुपदेशन’ हा कार्यक्रम संपन्न*

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्यासाठी ‘विद्यार्थी सुरक्षा समुपदेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. श्री सचिन काळे व अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिलीप सुतार, श्री ओमासे साहेब, श्री शेंडकर साहेब तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुजाता […]

1 min read

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन

प्रतिनिधी. पुणे, दि. ४: ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम न आलेल्या महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधारकार्ड जोडणी व सिडींग करण्यासह आपले बँक खाते सुरू असल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री – […]

1 min read

*श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत येथे किशोरवयीन मुला-मुलींसाठीची कार्यशाळा संपन्न…*

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात शुक्रवार दिनांक ४ऑक्टो.२०२४ रोजी किशोरवयीन मुला-मुलींसाठीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी साद मानस क्लिनिकच्या संस्थापक व मानसशास्त्र अभ्यासक मा. समीक्षा संध्या मिलिंद व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी केले. तसेच त्यांचा परिचय देखील करून दिला. या कार्यशाळेत मुलांशी संवाद […]