एम न्यूज मराठी च्या दुसरा वर्धापन दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप . 

Uncategorized

प्रतिनिधी –

एम न्यूज मराठी या न्यूज पोर्टलचा द्वितीय वर्धापन दिन नींबूत येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व वही, पेन वाटप करून संपन्न झाला.

 

या कार्यक्रमाचे आयोजन एम न्यूज मराठी टीम च्या वतीने प्राथमिक शाळा नींबूत येथे 10.30 वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सतीशभैया काकडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अभिजीत भैय्या काकडे, निर्भीड पत्रकारिता करून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम न्यूज मराठीच्या माध्यमातून केले जात आहे असे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले.

 

एम न्यूज मराठी च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम नेहमी राबवले जातात. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित. सतीश भैय्या काकडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप, विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे. साहेबराव दादा विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन अजितराव काकडे, नींबूचे माजी सरपंच राजकुमार बनसोडे, कांचन दादा निगडे ,विलास बनसोडे, उपसरपंच अमर भैया काकडे, शिवाजीराव काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, नीरा पोलीस स्टेशनचे, मदने साहेब, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे, नागटिळेकर साहेब, अमोल जी भोसले साहेब, पवार साहेब, अरुण फरांदे, बा.सा.काकडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ननावरे मॅडम,काळभोर साहेब, ग्रामपंचायत क्लार्क भाऊसो कोळेकर, प्रकाश जगताप. प्रसाद सोनवणे, किरण सूर्यवंशी, दत्तात्रेय सूर्यवंशी, अमर काकडे, चंद्रजीत काकडे नीरा नींबूत सोमेश्वर परिसरातील पत्रकार बंधू आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश फरांदे यांनी केले तर आभार संपादक मधुकर बनसोडे यांनी मानले.