Donot Miss
Latest Posts
Highlight
Popular News
सोमेश्वर साखर कारखान्यात तब्बल 54 लाखांचा घोटाळा; आरोपींवर गुन्हा दाखल न करण्यामागे राजकीय दबाव?
संपादक मधुकर बनसोडे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात तब्बल ₹54 लाख 29 हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा उघड झाला आहे. चार्टर्ड अकाउंटंटच्या तपासणीत गैरव्यवहार स्पष्ट झाल्यानंतरही आजवर आरोपींवर गुन्हा दाखल न झाल्याने सभासद व ऊस उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपींवर कोणतीच कारवाई नाही ! या प्रकरणात तत्कालीन लेबर ऑफिसर दीपक निंबाळकर व कर्मचारी रूपचंद […]
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये 54, लाख 29 हजाराच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल होणार का.
संपादक मधुकर बनसोडे. मागील काही महिन्यांपूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये जवळपास 54 लाख 29 हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन लेबर ऑफिसर दीपक निंबाळकर व रूपचंद साळुंखे या कर्मचाऱ्यांना कारखाना प्रशासनाने निलंबित केले. तर काही कर्मचारी जे निर्दोष होते त्यांना पुन्हा कामावरती घेण्यात आले कारखाना प्रशासनाकडून साखर आयुक्तांच्या पॅनल वरील मेहता आणि […]
मु.सा. काकडे महाविद्यालयास शालेय कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद.
प्रतिनिधी. सोमेश्वरनगर : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, येथील प्रांगनाथ संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी […]
बारामती ! ईद मिलादुन्नबी निमित्त लोकहित प्रतिष्ठान तर्फे बारामती येथे भव्य कव्वाली कार्यक्रम.
प्रतिनिधी – ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने बारामती येथे मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी लोकहित प्रतिष्ठान तर्फे भिगवन चौक येथे मशहूर कव्वाल हाजी सुलतान नाझा यांच्या कव्वालीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी नेत्रदीपक स्टेज सजवण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर (बा.न.प.) व बारामती नगरीचे मा. नगराध्यक्ष सुभाषशेठ सोमाणी […]
अखिल भारतीय मराठा महासंघ आणि धमाका महिला ग्रुपच्या वतीने ” राजमाता जिजाऊ माँसाहेब ” पुरस्कार सोहळा संपन्न.
प्रतिनिधी – सुभाष जेधे निरा (ता. पुरंदर )… दिनांक 08/09/2025 रोजी निरा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष जेधे आणि धमाका महिला ग्रुपच्या संस्थापक व मा. अध्यक्षा सौ तनुजाभाभी मनोज शहा व अध्यक्षा सौ नेहा नवेंदू शहा, तसेच सौ मोहिनी दत्तात्रय भिसे यांचे सुरेख सूत्रसंचालन सर्वांनां प्रेरित करून हा […]
अखिल भारतीय मराठा महासंघ आणि धमाका महिला ग्रुपच्या वतीने ” राजमाता जिजाऊ माँसाहेब ” पुरस्कार सोहळा संपन्न.
प्रतिनिधी – सुभाष जेधे निरा (ता. पुरंदर )… दिनांक 08/09/2025 रोजी निरा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष जेधे आणि धमाका महिला ग्रुपच्या संस्थापक व मा. अध्यक्षा सौ तनुजाभाभी मनोज शहा व अध्यक्षा सौ नेहा नवेंदू शहा, तसेच सौ मोहिनी दत्तात्रय भिसे यांचे सुरेख सूत्रसंचालन सर्वांनां प्रेरित करून हा […]
मु. सा. काकडे महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
सोमेश्वरनगर, प्रतिनिधी सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (यु.आय.डी. – बी०२१) विभागाच्या वतीने दिनांक ०८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘शिक्षक दिन समारंभ’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात श्री. जे. ई. पवार व प्रा. विष्णू लडकत यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. श्री. जे. ई. पवार यांनी आपल्या व्याख्यानात भारतातील शिक्षणव्यवस्थेचा ऐतिहासिक आढावा […]
बारामती ! वडगाव निंबाळकर पोलिसांची वाघळवाडी येथे हातभट्टीच्या अड्ड्यावर कारवाई ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
वडगाव निंबाळकर प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील वाघळवाडी (सावंतवस्ती) येथे वडगाव निंबाळकर पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करणारा अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० वा. सुमारास वाघळवाडी […]
बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती उत्साहात साजरी .
प्रतिनिधी – फिरोज भालदार आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती वडगाव निंबाळकर मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंती उत्साह सोहळ्यानिमित्त वडगाव निंबाळकर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी […]
ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या चार इसमांवरती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..
प्रतिनिधी. दिनांक 07/08/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मरीमाता कलेक्शन जवळ मूर्टी येथे www.funrep.pro या लिंक वरून मोबाईल मध्ये ID व पासवर्ड पाठवून ऑनलाइन जुगार चालवणारे इसम नामे 1. संतोष रामदास रासकर राहणार करंजे रासकर मळा तालुका बारामती जिल्हा पुणे. 2. महेंद्र रामचंद्र मोरे राहणार मूर्टी तालुका बारामती जिल्हा पुणे यांना त्यांच्याकडे असलेल्या मोबाईल सहित […]
