परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
श्रीनाथ मानव सेवा मंडळ व डॉ एकनाथ मुंडे यांचा अद्वितीय आणि स्तुत्य उपक्रम -डॉ स्वप्नील चौधरी
ग्रामीण मराठी साहित्याचा प्रसारासाठी अशा ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज-डॉ एकनाथ मुंडे
ग्रामीण मराठी साहित्याच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच नवोदित साहित्यिकांच्या साहित्य प्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी श्रीनाथ मानव सेवा मंडळ गेल्या काही वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष डॉ एकनाथ मुंडे यांच्या मुख्य संयोजनातून ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करत आहे त्याच धर्तीवर आज पापनाथेश्वर माध्यमिक विध्यालय नाथरा येथे ६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अतिशय उत्साहात आणि थाटामाटात प्रसिद्ध दंगलकार कवी डॉ स्वप्नील चौधरी व परळी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी मा .नम्रता चाटे मॅडम यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न झाले यावेळी परळी तहसील चे नायब तहसीलदार रुपनर साहेब, या संमेलनाचे मुख्यसंयोजक डॉ एकनाथ मुंडे ,संस्थेचे सचिव डॉ संतोषजी मुंडे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष न.प.परळी चे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक नागनाथ बडे,प्रा विठ्ठल जायभाय , राजेंद्र पाठक,डॉ रमेशचंद्र काबरा,संपादक सतिशजी बियाणी,सामाजिक कार्यकर्ते भास्करमामा चाटे, ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली लांब,परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे साहेब,उपनिरीक्षक गणेश झाम्बरे साहेब, ऍड.सौ.शुभांगीताई गित्ते तसेच या संमेलनाच्या कार्यवाहक शाळेच्या मुख्याध्यापिका सुलेखा मुंडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या साहित्य संमेलनाचा आरंभ भव्य अशा ग्रंथदिंडीने झाला ज्यामध्ये प्रसिद्ध साहित्यिक,शालेय विद्यार्थी यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा करून महाराष्ट्राच्या अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन घडवून दिलेउदघाटना नंतर ग्रामीण मराठी साहित्य क्षेत्रात ,सामाजिक क्षेत्रात,आरोग्य क्षेत्रात,कृषी क्षेत्रात,पत्रकारिता क्षेत्रात,उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना श्रीनाथ मानव सेवा मंडळाने साहित्य रत्न, साहि त्भूषण, बालसाहित्यभूषण, समाजभूषण, स्वास्थरक्षाभूषण, कृषिमित्र ,उद्योग भूषण,वार्ताभूषण असे पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. यामध्ये राजेंद्र पाठक (मुंबई )व आत्माराम कुटे (वडी), यांना साहित्य रत्न तर आत्माराम जाधव(राणीसावरगाव), स्वप्नील चौधरी(पुणे) ,सिंधुताई दहिफळे (हिंगोली),संध्यारणी कोल्हे(कळंब), द.ल. वारे(बीड),नागनाथ बडे (अंबाजोगाई),डॉ वसंत सातपुते(सोनपेठ),डॉ विठ्ठल जायभाय(सोनपेठ) ,बा.बा.कोटमंबे ,संजय राठोड,हभप दत्तात्रय महाराज आंधळे(परळी ),प्रकाश घातगीणे(बीड),विठ्ठल चव्हाण (अकोला) आदींना साहित्य भूषण तसेच परळीचे तालुक्याचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार रुपनर साहेब ,राधामोहन फौंडेशन चे पदाधिकारी सतिशजी बियाणी,मनीष खर्चे (अकोला),हभप ज्ञानेश्वर माऊली लांब(धारूर),प्रा डॉ ज्ञानोबा मुंडे(पिंपलदरी) ,डॉ भीमराव गणवीर (यवतमाळ), बाळासाहेब देशमुख (परळी वैजनाथ), भास्करमामा चाटे(परळी वैजनाथ), आत्माराम नेसतनकर(अकोला), देवेन्द्र बारगजे (जालना), प्रा डॉ बाबासाहेब शेप (परळी वैजनाथ),पै.मुरलीधर मुंडे (तळेगाव),पै.ज्ञानोबा मुंडे (कन्हेर वाडी) डॉ.रवींद्र जगतकर (मुंबई) ,विश्वजित मुंडे(परळी वैजनाथ),पद्माकर शिंदे(सेलू) यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर मुक्त पत्रकार अनिरुद्ध जोशी (परळी वैजनाथ), वार्ताहार राजा पुजारी (परळी वैजनाथ),वार्ताहर महादेव गित्ते (परळी वैजनाथ), वार्ताहार सचिन साखरे (केज) यांना वार्ता भूषन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याच बरोबर नंदगौळ चे आदर्श सरपंच सुंदर गित्ते यांना विशेष कार्यगौरव पुरस्कार ,परळीचे प्रसिद्ध उद्योजक बालाजी टाक यांना उद्योग भूषण व आदर्श शेतकरी म्हणून विठ्ठल साखरे ( मांडवा) व श्रीनिवास मुंडे (पांगरी) यांना कृषिमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ,त्याच बरोबर डॉ रमेशचंद्र काबरा (परळी),डॉ कादरी(अंबाजोगाई) यांना स्वास्थ रक्षाभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले . अशा या पुरस्कार सोहळ्यानंतर संमेलनाचा दुसऱ्या सत्रात डॉ एकनाथ मुंडे लिखित असावे आपुले घरटे छान या पुस्तकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले तदनंतर डॉ एकनाथ मुंडे यांनी संमेलनाचे प्रस्ताविकपर भाषण केले ज्यात ते म्हणाले की ग्रामीण मराठी साहित्याच्या प्रसारासाठी अशा ग्रामीण साहित्य संमेलनांची खुप गरज आहे तसेच त्यांनी ग्रामीण मराठी साहित्याचा त्यांच्या जीवनावर असणारा प्रभाव आणि या ६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली.उदघाटक डॉ स्वप्नील चौधरी यांनी त्यांच्या उदघाटनपर भाषणात बोलताना हे साहित्य संमेलन श्रीनाथ सेवा मंडळाचा व डॉ एकनाथ मुंडे यांचा एक अद्वितीय आणि स्तुत्य उपक्रम असे उद्गार काढले तसेच संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या ज्या कवितेने भारावून टाकले अशी चल दंगल समजून घेऊ ही कविता सादर केली आणि उपस्थितांची मने जिंकली मान्यवरांच्या मनोगतानंतर दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या कवी संमेलनामध्ये उपस्थित साहित्यिक नवोदित कवी ,बालकवी,शालेय विध्यार्थी यांनी आपापल्या कविता सादर करून उपस्थित साहित्य रसिकांना भारावून टाकले.अशा या ६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या साहित्य रसाचा आस्वाद घेण्यासाठी आणि या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण पंचकृषितील तसेच मुंबई, अकोला,यवतमाळ,पंढरपूर ,परभणी ,हिंगोली,गंगाखेड,सोनपेठ येथील साहित्यिक, साहित्य प्रेमी तसेच शालेय विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून ग्रामीण मराठी साहित्याचा गजर केला.अशा या साहित्य संमेलनाच्या प्रथम दिनाचे सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलेखा मुंडे (कराड)मॅडम यांनी केले.