• Home
  • ताज्या बातम्या
  • करंजे वि.का.सोसायटी करंजे चेअरमनपदी महेश हनुमंतराव शेंडकर यांची बिनविरोध निवङ
Image

करंजे वि.का.सोसायटी करंजे चेअरमनपदी महेश हनुमंतराव शेंडकर यांची बिनविरोध निवङ

प्रतिनिधी.
करंजे सोसायटी विध्यमान चेअरमन साहेबराव दगङू गायकवाड यांनी आपल्या ठरलेल्या मुदतीमध्ये चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. त्यामूळे रिक्त झालेल्या पदी चेअरमन निवङ घेण्यात आली होती.
आज महेश शेंडकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बारामती सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुङे यांनी त्यांची चेअरमनपदी निवङ जाहिर केली.
करंजे सोसायटीची स्थापना 1911 सालची आहे करंजे सोसायटीची वार्षिक उलाढाल 8 कोटी रुपयांवर आहे.तसेच संस्थेचे स्वमालकीचे व्यावसायिक गाळे आहेत.
महेश शेंडकर यांची चेअरमनपदी निवङ झाल्याने अभिनंदन करण्यात येत आहे.
महेश शेंडकर प्रगतशील बागायतदार आहेत.संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
यावेळी माजी चेअरमन निवृत्ती शेंडकर, शहाजीराव गायकवाड, अनिल गायकवाड, विध्यमान व्हाईसचेअरमन मच्छिंद्र शेंडकर,करंजेपूल मा सरपंच वैभव गायकवाड,शिवाजीराव शेंङकर,संचालक तानाजीराव गायकवाड,राहूल शेंडकर,शशिकांत गायकवाड,विठ्ठल गायकवाड,महेंद्र शेंडकर,रविंद्र गायकवाड,प्रकाश शेंडकर,कुसुम शेंडकर,मयुर शेंडकर संस्थेचे सचिव दिपक किसन शिर्के व क्लार्क सोमनाथ गायकवाड आदि उपस्थित होते.

Releated Posts

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

प्रतिनिधी महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले…

ByBymnewsmarathi Jun 27, 2026

बारामती ! कृषी अधिकारी यांच्याकडून सदोबाचीवाडी येथे सोयाबीन पिक प्रशिक्षण व शेतकऱ्यांना मार्गदर्शन .

प्रतिनिधी – फिरोज भालदार दिनांक २३ जून २०२६ रोजी सदोबाचीवाडी ता. बारामती येथे सोयाबीन पिक प्रशिक्षण राबविण्यात आले.…

ByBymnewsmarathi Jun 23, 2026

काकडे महाविद्यालयाची दैदीप्यमान वाटचाल- डॉ. सुरेश गोसावी

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर:- येथील माळरानावर 54 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या काकडे महाविद्यालयाची वाटचाल अत्यंत दैदिप्यमान सुरू असून या महाविद्यालयाच्या शिरपेचात…

ByBymnewsmarathi Jun 21, 2026

बारामती ! न्यू इंग्लिश स्कूल खलाटेवस्ती, लाटे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी – जनता शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, खलाटे वस्ती, लाटे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा…

ByBymnewsmarathi Jun 21, 2026