• Home
  • क्राईम
  • वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड
Image

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपींना निष्पन्न केले आहे. या कारवाईत तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे व एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, आरोपींकडून एकूण १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे कोन्हाळे बु. (ता. बारामती) येथील कठीण पूल परिसरातून फिर्यादीची लाल रंगाची मोटारसायकल (एमएच ४२ एपी ९४९६) चोरीस गेल्याची तक्रार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस पथक पेट्रोलिंगदरम्यान एका संशयित इसमाला नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल चालविताना आढळला.

त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांसह विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. कोन्हाळे बु., फलटण ग्रामीण (जि. सातारा) आणि लोणंद (जि. सातारा) येथून तीन मोटारसायकली चोरी केल्याचे समोर आले. तसेच, वडगाव परिसरात एका बंद घरात घरफोडी केल्याचेही निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात एक विधीसंघर्षित बालक व त्याचे साथीदार – मयूर नितीन भोसले (रा. कालठण नं. १, ता. इंदापूर) आणि दोन अनोळखी इसम यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित चार गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दाखल आहेत.

पोलीसांनी आरोपींच्या सांगण्यावरून चोरीस गेलेल्या तीन मोटारसायकली आणि इतर मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Releated Posts

हुंड्याच्या छळातून १८ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

प्रतिनिधी पुण्यातील कोथरूड परिसरात हुंड्यासाठी छळ करून १८ वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला…

ByBymnewsmarathi May 12, 2026

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील २.३८ कोटींचा वेतन घोटाळा उघड

प्रतिनिधी लातूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वेतन वाटप विभागात तब्बल २ कोटी ३८ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा धक्कादायक…

ByBymnewsmarathi May 12, 2026

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीकडून निर्घृण खून

प्रतिनिधी हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक…

ByBymnewsmarathi May 7, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026