कारंजेपूल येथे सरकारी कामात अडथळा घालुण जिवे मारण्याची धमकी ! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

Uncategorized

प्रतिनिधी- फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील करंजेपूल गावातील जमीन गट नं. २० मध्ये ७-१‐२०२३ रोजी करंजेपूल ग्रामपंचायतचे शासकीय काम गटार लाईन व पाणी पाईपलाईन ची कामे चालू असताना काम करण्यासाठी जे सी बी लावला होता. जे सी बी चालकास चारी खोदण्यासाठी फिर्यादी सुजाता आगवणे ‘ग्रामसेवक’ हे गटार व पाईप लाईन दाखवीत असताना त्या ठिकाणी नामे शोभा ज्ञानदेव चांदगुडे, सिंधू ज्ञानदेव चांदगुडे व ज्ञानदेव पार्वती चांदगुडे सर्व रा. करंजेपूल ता. बारामती जि. पुणे हे इसम तीथे आले व फिर्यादी व इतर यांला शिविगाळ दमदाटी करून तुम्ही या ठिकाणी काम चालू करायचं नाही असे म्हणाले असता.फिर्यादि यांनी हे काम सरकारी आहे तुम्ही काम अडवू नका असे म्हणाले यावरुन ज्ञानदेव पार्वती चांदगुडे यानी हातात दगड घेऊन फिर्यादी व इतर यांच्या अंगावर धावून गेला व सरकारी कामासाठी आणलेला जे सी बी चे काम बंद पाडून फिर्यादीला तुम्ही काम चालू केलं तर तुम्हाला जिवे मारून टाकेल अशी धमकी दिली. म्हणून सुजाता आगवणे यांनी त्या तीन इसमाविरुध्द वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली .व फिर्यादिच्या फिर्यादवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो .स .ई . शेलार सो हे करीत आहेत.