• Home
  • ताज्या बातम्या
  • अश्लील मेसेज, ब्लॅकमेल आणि फेक इन्स्टाग्राम; कारंजे येथील युवकांवर पॉक्सोसह गंभीर गुन्हा दाखल.
Image

अश्लील मेसेज, ब्लॅकमेल आणि फेक इन्स्टाग्राम; कारंजे येथील युवकांवर पॉक्सोसह गंभीर गुन्हा दाखल.

वडगाव निंबाळकर,

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलेचा बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करणे, अश्लील संदेश पाठवणे, अश्लील फोटो व व्हिडिओची मागणी करणे तसेच ते व्हायरल करण्याची धमकी देऊन बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक मधूकर दुबळे (रा. करंजे, ता. बारामती, जि. पुणे) याने एप्रिल २०२६ पासून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत एका महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार केल्याचा आरोप आहे. या आयडीवरून फिर्यादी महिलेला अश्लील फोटो पाठवून तिच्याकडे नग्न फोटो पाठविण्याची मागणी केली. तसेच, “फोटो व्हायरल करायचे नसतील तर नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल करून बोल,” असा संदेश पाठवून दबाव टाकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी आरोपीने महिलेचे नग्न फोटो व व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये जतन करून ते परिसरातील काही व्यक्तींना पाठवल्याने तिची बदनामी झाली तसेच तिच्या मनात लज्जा व भीती निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१९, ७७, ७८, २९५, तसेच बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम (POCSO) कलम १२, १४, १५ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७(अ), ६७(ब), ६६(क), ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार हे करीत असून, संबंधित प्रकरणाचा अहवाल विशेष न्यायालय, बारामती येथे पाठविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Releated Posts

आळंदीतील चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांना आहे त्या ठिकाणीच थांबण्याचे प्रशासनाचे आवाहन

​सहसंपादक- अक्षय थोरात आषाढी वारी २०२६ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीव​मुख्​मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या वतीने…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे तसेच नागरिकांमध्ये वाहतूक…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६कर्जमुक्तीबाबत महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे जाणून घेवूया

प्रतिनिधी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’अंतर्गत कर्जमाफी, एकवेळ समझोता, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ, पात्रता, अपात्रता, अर्ज…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

निंबुतमध्ये कृषी दिन उत्साहात; बारामती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोमेश्वरनगर (ता. बारामती), दि. ३ : बारामती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत निंबुत येथे शुक्रवार…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026