बारामती शहरात अनंत नगर आंबेडकर वसाहत येथे किरकोळ कारणावरून महिलांसह दोन गटात तुंबळ हाणामारी

Uncategorized

प्रतिनिधी

 काल दिनांक 11/१/२०२३ रोजी 19.00 वाजता आनंदनगर वसाहत आमराई बारामती येथे दोन गटात भांडणे चालू असले बाबत माहिती मिळाली वरून तात्काळ सदर ठिकाणी पोलीस स्टाफ तात्काळ पाठवला असता दोन गटात भांडणे चालू होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा समावेश होता. पोलीस परिस्थिती शांत करत असताना महिला पोलिसांच्या गाडीला सुद्धा आडव्या जात होत्या त्यातील काही लोकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून गुर नंबर 21/ 23 भादवी 143 147 149 354 324 323 427 327 504 506 महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 135 प्रमाणे आरोपी नामे १.धनंजय तेलंगे 2. ऋषिकेश तेलंगे 3.रोहित तेलंगे 4.चिंट्या सुतार 5.मयूर सुतार 6. तुषार शिंदे 7.करण शिंदे 8.गोविंद तेलंगे 9.बबलू कसबे 10.करण दिवटे सर्व राहणार आंबेडकर वसाहत आमराई बारामती यांचे वर गुन्हा दाखल केला आहे तसेच येथील दुसरा गट यांचेवर गु र नंबर 22/ 2023 भादवी कलम 143 147 149 354 354 327 324 504 506 8 12 महाराष्ट्र पोलीस 135 प्रमाणे आरोपी नामे १.करण विला स सकट 2.श्याम विलास सकट 3. निलेश सकट 4.बेबीताई विलास सकट 5.बेबीताई विलास सकटची मुलगी रेश्मा पूर्ण माहित नाही सर्व राहणार साळवे नगर अमराई जिल्हा पुणे यांचे वर परस्परविरोधी गुन्हे दाखल केला मारामारी करून दोन्ही गटांनी महिला तक्रारदार पुढे करून विनयभंगासह दंगलीचा गुन्हे दाखल केलेले आहे. या वसाहतीत किरकोळ कारणावरून वारंवार दंगल सदृश्य गुन्हे रात्रीच्या वेळेस घडतात याबाबत नागरिक त्रस्त आहेत . यापुढे गंभीर गुन्हे दाखल करून सदर भागात याप्रकारे गुन्हे करणाऱ्यांचा रेकॉर्ड तयार करून त्यांना तडीपार करणार आहे वेळ व समय सूचकता दाखवून घटनास्थळी जाऊन मोठा अनर्थ टाळला पुढील कारवाई करीत आहोत.