मुलाला मारून टाकून नातेवाईकांत बदनामीची धमकी देणाऱ्यावर गुन्हा
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी
लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः पुणे, ता. १२ : विधवा महिलेला ३ वेळा भेटण्याची अट घालत तुझ्या मुलाला मारून टाकीन, नातेवाईकांत बदनामी करेल अशी धमकी देणाऱ्यावर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतोष चंद्रकांत काळभोर असे गुन्हा दाखल कऱण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पीडित महिलेच्या ओळखीचा आहे. ती पतीच्या निधनानंतर तो काम करीत असलेल्या ठिकाणी नोकरी करते. जुन्या ओळखीतून काळभोर याने महिलेला ‘तू माझ्यासोबत प्रेम करणार नसशील, तर मी तुझ्या घरी येऊन नातेवाईकांना सांगेन व तुझी बदनामी करेल,’ अशी धमकी दिली. फिर्यादीला जबरदस्तीने मिठी मारून लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच, फिर्यादीच्या कानाखाली मारून तिला शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार २०१८ ते २८ डिसेंबर २०२२ दरम्यान घडला. या प्रकरणी काळभोर याला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक उमरे यांनी सांगितले.
