मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 17 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी दत्तात्रय गंगाराम माळशिकारे यांची नियुक्ती ; सामाजिक व शैक्षणिक कामाची राज्य सरकारकडून दखल

mnewsmarathi 17 Nov 2026 1 मिनिट वाचन 3,579 वाचन

कोऱ्हाळे बुद्रुक – प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक गावातील मलाशिकारेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच दत्तात्रय गंगाराम माळशिकारे यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक खासकरून शैक्षणिक कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे.

    दत्तात्रय माळशिकारे हे परिसरात डी. जी. या नावाने परिचित आहेत. त्यांनी यापूर्वी कोऱ्हाळे बुद्रुक गावाचे उपसरपंच म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी माळशिकारे वस्तीचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. गावातील शेवटच्या घटकांपर्यंत विविध शासकीय योजना पोचाव्यात यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

    श्री. सिद्धेश्वर प्रतिष्ठानच्या श्री. सिद्धेश्वर पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. सामाजिक कामातही ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य इंग्रजी माध्यम शाळा संस्थाचालक या राज्यस्तरीय संस्थेचे राज्य उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

     त्यांच्या या नियुक्तीने कोऱ्हाळे बुद्रुक गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला असून त्यांच्या निवडीने गावात आनंदाचे वातावरण आहे. शासनाने दिलेल्या या जबाबदारी बद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले असून येणाऱ्या काळात शासन व जनता यांच्यातील दुवा बनून सर्वसामान्य जनता केंद्रस्थानी म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi