मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Sunday, 4 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

जेजुरी पोलिसांची निरा येथे ऑनलाइन जुगारावर कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल

mnewsmarathi 20 Aug 2026 1 मिनिट वाचन 9,489 वाचन

प्रतिनिधी

 

निरा गावातील वॉर्ड क्रमांक ६, बजाज शोरूमजवळील पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाइन ‘चक्री’ नावाचा जुगार खेळविला जात असल्याची कारवाई जेजुरी पोलिसांनी १९ ऑगस्ट रोजी केली. या कारवाईत दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून संगणक संच, जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ₹३०,५१० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पहिल्या कारवाईत अरुण बाळू चव्हाण (वय ४३, रा. खामगाव, ता. फलटण, जि. सातारा) याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून मॉनिटर, सीपीयू, माऊस-किबोर्ड, बॉलपेन, १ ते १० अंक असलेला फ्लेक्स बॅनर आणि ₹१,७०० रोख असा एकूण ₹१५,४०५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५०/२०२६ अन्वये मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत महेश संभाजी पाटील (वय ३०, रा. व्ही.एन.एस. सिटी, निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून मॉनिटर, सीपीयू, माऊस-किबोर्ड, बॉलपेन, फ्लेक्स बॅनर आणि ₹२,४०० रोख असा एकूण ₹१५,१०५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गु.र.नं. २५१/२०२६ अन्वये मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कारवाया १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निरा परिसरात करण्यात आल्या. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस कर्मचारी मदने तसेच ग्रेपोसई/कोकरे यांच्याकडे देण्यात आला असून, कारवाई जेजुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दरम्यान, निरा परिसरात ऑनलाइन जुगाराच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारच्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi