मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

ई-पेपर डिजिटल आवृत्ती

M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

संपादक: मधुकर बनसोडे तारीख: Thursday, 20 August 2026 दैनंदिन डिजिटल ई-पेपर आवृत्ती

सोमेश्वरच्या उच्चांकी ऊसदरामुळे सभासदांमध्ये आनंदोत्सव; चेअरमन, संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

विशेष वृत्त प्रतिनिधी

■ विशेष प्रतिनिधी कडून | 12:36 PM

प्रतिनिधी

 

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या हिताचा निर्णय घेत अनुदानासह जवळपास ४ हजार रुपये प्रतिटन ऊसदर दिल्याने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्चांकी ऊसदर जाहीर झाल्यानंतर अनेक सभासदांनी कारखाना प्रशासनाचे अभिनंदन करत चेअरमन व संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांसाठी जाहीर करण्यात आलेला हा दर राज्यातील ऊसदराच्या चर्चेत महत्त्वाचा ठरला आहे. ऊस उत्पादनासाठी वाढलेला मशागत खर्च, खते, औषधे, मजुरी, वीज तसेच पाण्याचा खर्च यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत कारखान्याने सभासदांच्या हिताचा विचार करून जवळपास अनुदानासह चार हजार रुपये प्रतिटन इतका ऊसदर दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ऊसदराची घोषणा झाल्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रातील अनेक सभासदांनी चेअरमन व संचालक मंडळाची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सभासदांकडून पुष्पगुच्छ देऊन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कारखान्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत असून, ऊस उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, सोमेश्वर कारखान्याने यापूर्वीही ऊस उत्पादकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध निर्णय घेतले आहेत. कारखान्याची आर्थिक स्थिती, साखरेचे बाजारभाव आणि उत्पादन खर्च यांचा समतोल साधत सभासदांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाकडून करण्यात येत असल्याचे सभासदांचे म्हणणे आहे.

“ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याचा केंद्रबिंदू असून त्याच्या घामाला योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. अनुदानासह चार हजार रुपये प्रतिटन दर मिळाल्याने सभासदांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे,” अशी भावना अनेक सभासदांनी व्यक्त केली.

सोमेश्वर कारखान्याच्या या उच्चांकी ऊसदरामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, कारखाना कार्यक्षेत्रात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मोबाईल: +91 9604752782 वेबसाईट: https://mnewsmarathi.com/ ई-मेल: contact@mnewsmarathi.com