प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा (शेळगाव )येथे मुलांना व्यवहारज्ञान कळावे व स्वतःच्या शेतातील भाजीपाला कसा विकावा या हेतूने आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजाराचे उद्घाटन केंद्र प्रमुख सुपुते साहेब ग्रामपंचायत शेळगाव सदस्या सौ.प्रियांका जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास शिंगाडे व इतर सदस्य यांचे हस्ते करण्यात आले.
*बाजारात विकण्यासाठी मुलांनी वांगे , टोमॅटो , कारले , भेंडी , कांदे , बटाटा , कोथिंबीर , मेथी , पेरू ,घेवडा , शेवगा,भेळ ,पाणी पुरी ,इडली ,बिर्याणी अशा सर्व प्रकारची मेनु उपलब्ध होते त्याचप्रमाणे शालेय स्टेशनरी साहित्य , वडापावचे स्टाल मुलांनी लावले होते. महिला पालक , ग्रामस्थ यांनी खरेदीसाठी गर्दी केली. यावेळी बाजारात एकूण बारा हजार रुपयापर्यंत उलाढाल झाली.*
यावेळी यावेळी पोपट शिंगाडे,अमोल जाधव, शामराव जाधव,अरुण जाधव ,संजय वायसे,कैलास शिंगाडे स्वप्नील खरात कुशाबा बनसुडे श्रावणकुमार जाधव राजु शेख नितीन मिसाळ सर अनिल वाघमोडे सर उमेश सुपुते सर नामदेवगुंड सर विठ्ठल सोनटक्के सर तसेच महिला रंजना बनसोडे रेश्मा जाधव रेश्मा शेख कल्पना जाधव कविता शिरसट सोनाली पवार सुनिता जाधव उपस्थित होते. यावेळी बहुसंख्येने पुरुष व महिला वर्ग उपस्थितीत राहुन मुलांचा आनंद व्दिगुणित केला बाजाराचे नियोजन मुख्याध्यापक प्रताप शिरसट , जुबेदा पठाण मॅडम यांनी केले