मुख्य मजकुरावर जा
Saturday, 5 September 2026

चेन स्नॅचिंगचे २ गुन्हे उघड; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दरोडा विरोधी पथकाची कारवाई

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 4, 2026 1 मिनिट वाचन 3,505 वाचन

प्रतिनिधी

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ (गुन्हे शाखा, पुणे शहर) यांनी धडक कारवाई करत मांजरी व चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेन स्नॅचिंगचे २ गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून ४,८०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ चे सपोनि मोहसिन पठाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे, पोलीस हवालदार परेश सावंत, पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे, पांडुरंग नाणेकर व आव्हाळे हे गस्त घाजत असताना हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मावळा हॉटेलसमोरील गल्लीत आले. त्यावेळी तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी व चंदननगर येथील चेन स्नॅचिंग, तसेच नंबर प्लेट नसलेली दुचाकी घेऊन संशयित आरोपी डीपी रोडवरील एका गल्लीत थांबल्याची माहिती मिळाली. स्टाफच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली.

स्वप्निल सतीश आहेर (रा. भेकराई नगर, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी करून त्यास मांजरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याकडून एकूण ४,८०,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर), मा. श्री. संजय दराडे (पोलीस सह आयुक्त), मा. श्रीमती तेजस्वी सातपुते (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे), मा. श्री. गौहर हसन (पोलीस उपायुक्त, गुन्हे) व मा. श्री. शंकर खटके (सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे ३) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजूम बागवान, सहायक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण, पो.उप निरीक्षक संतोष तानवडे, सहा.फौ. कैलास चव्हाण, सहा.फौ. जोतीबा कुरळे, पो.हवा. परेश सावंत आणि पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे, विजय आव्हाळे, पांडुरंग नाणेकर, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर, तसेच पोलीस अंमलदार आव्हाळे यांच्या पथकाने केली आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख