मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याचा आरोप !!!

mnewsmarathi 15 Oct 2026 1 मिनिट वाचन 4,584 वाचन

प्रतिनिधी : अक्षय थोरात,

माळेगाव : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची क्रूरपणे वाहतूक केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात माळेगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. बारामती-मोरगाव मार्गावरील कर्‍हावागज गावच्या हद्दीत कृषी गार्डन हॉटेलजवळ होंडा सिटी कारचा अपघात झाला. या घटनेत दोन गोवंशीय वासरांचा मृत्यू झाला, तर १५ जिवंत वासरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ वाजण्यापूर्वी हा प्रकार घडला. मुबिन अल्ताफ कुरेशी यांच्या नावावर असलेल्या ग्रे रंगाच्या होंडा सिटी कारमधून अल्ताफ शफी कुरेशी आणि आक्रम अल्ताफ कुरेशी हे जनावरांची वाहतूक करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

संबंधित वाहनामध्ये अंदाजे दोन महिन्यांची १७ जर्शी गोवंशीय वासरे आणि एका म्हशीचे रेडकू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जनावरांना वाहनात दाटीवाटीने कोंबून क्रूरपणे वाहतूक केली जात असल्याचा आरोप आहे. दरम्यान, चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवल्याने अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात दोन जर्शी वासरांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित व्यक्तींनी घटनास्थळावरून पलायन केल्याचाही आरोप आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीची होंडा सिटी कार, दोन मृत वासरे आणि १५ जिवंत वासरे असा एकूण दोन लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये कारची किंमत दोन लाख रुपये, मृत वासरांची किंमत चार हजार रुपये आणि जिवंत वासरांची किंमत ३० हजार रुपये नमूद करण्यात आली आहे.

या प्रकरणी मुबिन अल्ताफ कुरेशी, अल्ताफ शफी कुरेशी आणि आक्रम अल्ताफ कुरेशी (सर्व रा. कुरेशी मोहल्ला, मंगळवार पेठ, फलटण, जि. सातारा) यांच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८४/२०२६ अन्वये १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.१६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(अ) व ११(१)(ब), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ मधील संबंधित तरतुदी तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोहोळे (ब.नं. १९०१) करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार होळकर (ब.नं. ३२९७) यांनी केली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi