ग्रामपंचायत उदापूर यांच्या अलगर्जी पणाने अतिक्रमित संताची बोडी साठी दिवाकर मंडपे यांचा आमरण उपोषण 

इतर

प्रतिनिधी

  ब्रह्मपुरी जवळील एक किलोमीटर अंतरावर असलेला उदापूर गाव हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नेहमी चर्चेत असते मग ते जुगार असो मटका असो की अवैध दारू व मुरूम असो ह्या गावची ३००० लोकसंख्या असून ह्या गावात नेहमी पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो पण ग्रामपंचायत प्रशासन हा त्यांच्याकडे कानाडोळा करीत राहतो गावाजवळ लागून नाला आहे त्या नाल्यामुळे पूर्ण गावातील लोकांना पाणीपुरवठा केल्या जाते पण त्या नाल्यात रासायनिक युक्त पाणी सोडल्या जात असून त्यामुळे लोकांचं जनजीवन सुद्धा आता धोक्यात आले आहे तसेच गावालगत संतांची बोडि म्हणून नावलौकिक असलेली त्यात पाणीसाठा हा मोठ्या प्रमाणात केला जातो कारण जनावरांना पाणी मिळावा आणि पाण्याचा स्त्रोत कायम राहावा यासाठी मागील वर्षी १० जानेवारी ला दिवाकर मंडपे हे उपोषणाला बसले होते.

संताच्या बोडि मध्ये जी अतिक्रमित घरे बांधकाम करीत आहे त्यांना रोखण्यासाठी , तेव्हा ते बांधकाम रोखून शासनाचा पैसा खर्च करून तो घर पाडण्यात आला पण त्याने पुन्हा एकदा पक्का बांधकाम करून ग्रामपंचायतला न माहीत करता मुजोरीने बांधकाम केले तेव्हा ग्रामपंचायतला सतत विचारणे केली असता दिवाकर मंडपे यांना नेहमी उडवा उडवीचे उत्तर ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळत होते म्हणून आता दिवाकर मंडपे यांनी पुन्हा १६ जानेवारी २०२३ ला लोकांना पाण्याची टंचाई भासू नये म्हणून उदापूर ग्रामपंचायत च्या समोर उपोषणाला बसत आहे याकडे उदापूर ग्राम वासियाचे लक्ष लागले असून दिवाकर मंडपे यांना न्याय मिळेल का ?