मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Wednesday, 30 September 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

जुबिलंट भारतीया फाऊंडेशन समाजसेवेसाठी कटिबध्द

mnewsmarathi 30 Sep 2026 1 मिनिट वाचन 3,854 वाचन

प्रतिनिधी

ज्युबिलंट इंग्रेव्हिया लिमिटेडअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘ज्युबिलंट भरतीया फाउंडेशन’च्या वतीने नीरा-निंबूत परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेची बांधिलकी जपली जात आहे.

​ज्युबिलंट भरतीया समूहाद्वारे २००७ मध्ये ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. सर्व घटकांना सोबत घेऊन धोरणात्मक भागीदारीद्वारे समाजात प्रगतीशील बदल घडवून आणणे, हे फाउंडेशनचे मुख्य ध्येय आहे. संस्थेमार्फत प्रामुख्याने पर्यावरण, शिक्षण, आरोग्यसेवा आणि महिला सक्षमीकरण या चार महत्त्वाच्या घटकांवर विशेष भर दिला जात आहे.

​नीरा व निंबूत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी फाउंडेशनतर्फे खालील महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात येत आहेत:

 

आरोग्य सुविधा: निंबूत परिसरात ‘फिरत्या दवाखान्या’द्वारे गावातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली जात आहे.

​पर्यावरण व शेती विकास: परिसरातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले आहे.

​आरोग्य जनजागृती: क्षयरोग दिनानिमित्त विशेष जागरूकता मोहीम राबवण्यात आली.

​महिला सक्षमीकरण: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नीरा येथे विशेष ‘फूड फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले.

​तसेच, नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी ‘हक्कदर्शक योजना केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. ज्युबिलंट भरतीया फाउंडेशनच्या या विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे स्थानिक परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi