मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Sunday, 4 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत काकडे महाविद्यालयाला सांघिक विजेतेपद

mnewsmarathi 04 Oct 2026 1 मिनिट वाचन 4,795 वाचन

प्रतिनिधी

 

 सोमेश्वर नगर– रविवार दिनांक 4/10/2026 रोजीअण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा अंतर महाविद्यालय क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये सोमेश्वर नगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद मिळवले

विजय संघातील खेळाडू पुढील प्रमाणे सार्थक मोरे ,मयूर येळे, नवनाथ बरकडे कुणाल जाधव ,आदित्य मदने, जगन्नाथ गडदरे या खेळाडूंनी जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये महाविद्यालयाला सांघिक विजेतेपद मिळवून दिले मयूर येळे आणि कुणाल जाधव या खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली

 

विजयी खेळाडूंना प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे व प्रा दत्तराज जगताप यांचे मार्गदर्शन लाभले आणि संघ व्यवस्थापक म्हणून प्रा.गोरख काळे यांनी काम पाहिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच खेळाडूंना प्राचार्य कक्षामध्ये बोलावून त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी त्यांना जास्तीत जास्त सुविधा महाविद्यालयातर्फे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले

 

संस्थेचे अध्यक्ष मा. सतीशराव काकडे- देशमुख महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. अभिजीत भैय्या काकडे- देशमुख सचिव श्री सतीश लकडे यांनी देखील विजय खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

लेखक

mnewsmarathi

M News Marathi