मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 20 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

विद्रोही, बंडखोर कवी मिर्झा ऊर्फ रोहित पेटारे यांचा ‘ ग्रेव्हयार्ड ‘ कवितासंग्रह लवकरच वाचकांच्या भेटीला 

mnewsmarathi 20 Nov 2026 1 मिनिट वाचन 3,943 वाचन

 प्रतिनिधी

आपल्या बंडखोर व प्रस्थापित समाजविरोधात धारदार लेखणीने हल्ला चढवणारे विद्रोही कवी मिर्झा अर्थात रोहित शिवाजीराव पेटारे यांच्या ‘ग्रेव्ह यार्ड : मुर्दाड समाजाच्या जिवंत कविता’ या विद्रोही कवितासंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.

या प्रकाशन सोहळ्यानिमित्त दोन सत्रांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्या सत्रात पुस्तक प्रकाशन सोहळा, तर दुसऱ्या सत्रात विद्रोही कवी संमेलन पार पडणार आहे.

‘ग्रेव्हयार्ड’ हा कवितासंग्रह समाजातील मुर्दाड संवेदना, सामाजिक विषमता, शोषण, अन्याय आणि व्यवस्थेच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या विद्रोही अभिव्यक्तीचा साहित्यिक दस्तऐवज म्हणून वाचकांसमोर येत आहे. मिर्झा पेटारे यांच्या लेखणीतून व्यक्त होणारा सामाजिक आक्रोश आणि परिवर्तनाची आकांक्षा या संग्रहाच्या केंद्रस्थानी आहे.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रबुद्ध विद्रोही कवी पी. के. कवि बबन दादा सरवदे (मुंबई) यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे म्हणून पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, विद्रोही कवी सागर दादा काकडे (सातारा) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून विद्रोही कवी जितेंद्र सोनवणे (जित्या जाली), तसेच प्रकाशक डॉ. पंकज चाळके (मुंबई) उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या सत्रात विद्रोही कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, सहभागी होणार असून, आपल्या कविता आणि विद्रोही साहित्याच्या माध्यमातून सामाजिक वास्तव, शोषित-वंचितांचे जगणे आणि परिवर्तनवादी विचार मांडणार आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विद्रोही कवी पी. के. कवि बबन दादा सरवदे (कोल्हापूर) असतील.

विद्रोही कवी जितेंद्र सोनवणे (पंढरपूर) आणि विद्रोही कवी विक्रम कांबळे (राजन, सोलापूर) उपस्थित राहतील. या संमेलनाचे सूत्रसंचालन दादा बाचमारे करणार आहेत.

हा कार्यक्रम बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ३:३० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का चौक, पुणे रेल्वे स्टेशनजवळ, पुणे येथे पार पडणार आहे.

साहित्य, सामाजिक परिवर्तन आणि विद्रोही विचारांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 विद्रोही साहित्यात ग्रेव्हयार्ड ठरणार मैलाचा दगड – विद्रोही कवी मिर्झा उर्फ रोहित शिवाजीराव पेटारे आपल्या धारदार लेखणीसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लिखाणातून नामदेव ढसाळ यांच्या लेखणीची झलक पाहायला मिळते. त्यामुळे त्यांचा आगामी ग्रेव्हयार्ड हा कवितासंग्रह बंडखोर व विद्रोही साहित्य प्रकारात मैलाचा दगड ठरणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi