मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 24 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

सोमेश्वर कारखान्याच्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान!

mnewsmarathi 24 Nov 2026 1 मिनिट वाचन 3,508 वाचन

शाल, श्रीफळासह भेट दिलेल्या पेनमधून योग्य निर्णयांचा संदेश; महिला पदाधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका कार्याध्यक्ष सुचिता ताई साळवे, माजी पंचायत समिती सभापती निताताई फरांदे, सरचिटणीस प्रज्ञा शिंदे, सरचिटणीस खुर्शिदा मुलाणी, महिला संचालक तसेच इतर संचालक उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्यात चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना पारंपरिक शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र, यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी दिलेली खास भेट सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. दोन्ही पदाधिकाऱ्यांना सुंदर पेन भेट देण्यात आले.

या भेटीमागे एक सकारात्मक संदेश देण्यात आला. या पेनच्या माध्यमातून कारखान्याच्या कामकाजात योग्य निर्णय घेऊन सभासद, शेतकरी व कामगारांच्या हिताची वाटचाल व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीत पारदर्शकता, योग्य निर्णयक्षमता आणि सभासदांचे हित यांना प्राधान्य मिळावे, हा या भेटीमागील उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

महिला पदाधिकाऱ्यांनी दिलेली ही आगळीवेगळी भेट केवळ सत्कारापुरती मर्यादित न राहता नव्या नेतृत्वाला जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि योग्य निर्णय घेण्याचा संदेश देणारा उपक्रम ठरला.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi