मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Wednesday, 25 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

बारामतीत 135 आरोपी जेरबंद ! पहाटेच्या धडक मोहिमेत 65 वॉरंटधारकांसह 70 फरारी ताब्यात

mnewsmarathi 25 Nov 2026 1 मिनिट वाचन 4,206 वाचन

प्रतिनिधी

न्यायालयाचे पकड वॉरंट बजावूनही पोलिसांना गुंगारा देणारे आणि विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेले आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. बारामती शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून 135 आरोपींना अटक केली.त्यामध्ये न्यायालयाचे पकड वॉरंट असलेल्या 65, तर विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या 70 आरोपींचा समावेश आहे. पहाटेच्या सुमारास संशयितांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यांमुळे पोलिसांच्या या कारवाईची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

बारामती शहर पोलिसांनी प्रलंबित गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. पकड वॉरंट असलेल्या आरोपींची माहिती संकलित करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पहाटेच्या वेळी नियोजनबद्ध छापे टाकले. या कारवाईत 65 आरोपींना पकडण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती आहेदरम्यान, बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये तब्बल 230 आरोपी अनेक दिवसांपासून फरार होते. त्यापैकी 70 आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी मोकाट फिरत असतील, तर तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अशा आरोपींचा शोध घेऊन त्यांना न्यायालयासमोर उभे करणे महत्त्वाचे ठरते.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. बारामती शहर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक मनिषा ओमासे यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतलान्यायालयीन वॉरंटची प्रभावी अंमलबजावणी आणि फरारी आरोपींचा शोध यामुळे प्रलंबित खटल्यांच्या प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होऊ शकते. मात्र, ही मोहीम केवळ अटकसंख्येपुरती मर्यादित न राहता गुन्ह्यांचा तपास, दोषारोपपत्र आणि न्यायालयीन निकालापर्यंत सातत्याने पुढे जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi