मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 27 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन तर्फे भोसरी येथे मानवतेचा संदेश देणारे रक्तदान शिबिर

mnewsmarathi 27 Nov 2026 1 मिनिट वाचन 4,132 वाचन

प्रतिनिधी.

भोसरी, : रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून मानवतेप्रती व्यक्त केलेली एक अनमोल सेवा आहे. रक्ताच्या नात्यापेक्षाही माणुसकीचे नाते श्रेष्ठ असल्याचा संदेश देत संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपेने आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताच्या अभावामुळे कोणत्याही रुग्णाला उपचारांमध्ये अडचण येऊ नये हा आहे.
या उपक्रमामागे निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांचा मानवतेचा महान संदेश आहे – “रक्त नाड्यांमध्ये वाहू द्या, नाल्यांमध्ये नाही.” या विचारातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील प्रत्येक घटकाला मानवसेवेच्या या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आज अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून कर्करोग, थॅलेसेमिया तसेच विविध गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता असते. तसेच अनेक शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन उपचारांसाठी रक्त उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत रक्तदान करणारा प्रत्येक दाता हा गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरतो.
या मानवसेवेच्या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे आणि इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या वतीने करण्यात येत आहे.
“आपले रक्तदान एखाद्याच्या जीवनात नव्या आशेचा संचार करू शकते. चला, रक्तदानातून माणुसकीचे नाते अधिक दृढ करूया.”

लेखक

mnewsmarathi

M News Marathi