• Home
  • माझा जिल्हा
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त १८९ बंद्यांची सुटका
Image

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त १८९ बंद्यांची सुटका

प्रतिनिधी

  पुणे, दि.२७: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त् भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत घालून देण्यात आलेल्या निकषाची पुर्तता केलेल्या राज्यातील कारागृहातील १८९ बंद्यांची सुटका करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत निकष ठरविण्यात आले होते. त्यानुसार अमरावती मध्यवर्ती कारागृहातील १२, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह ११, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह ७, मुंबई मध्यवर्ती कारागृह ४, नागपूर मध्यवर्ती कारागृह ३५, नाशिक मध्यवर्ती कारागृह ३५, तळोजा मध्यवर्ती कारागृह १६, ठाणे मध्यवर्ती कारागृह ११, येरवडा मध्यवर्ती कारागृह २०, अकोला जिल्हा कारागृहातील ३, भंडारा ३, चंद्रपूर २, कोल्हापूर २ सिंधुदूर्ग ४, वर्धा २, वाशिम १, यवतमाळ जिल्हा कारागृहातील १, औरगांबाद खुल्या कारागृहातील १३, पैठण खुले कारागृह ४, येरवडा खुले कारागृह १, येरवडा महिला कारागृतील २ असे एकूण १८९ बंद्यांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026