मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर येथे कुटुंब प्रबोधन व होम मिनिस्टर कार्यक्रम जल्लोषात संपन्न. 

mnewsmarathi 29 Jan 2023 1 मिनिट वाचन 9,653 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

  वडगाव निंबाळकर येथे रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हळदीकुंकू समारंभ निमित्त पालकांसाठी कुटुंब प्रबोधन, कुटुंबातील समस्या, कुटुंब मिलन यासारख्या विविध विषयांवर व्याख्यान आयोजित केले होते.

यासाठी विवेक पांडकर सर यांनी मार्गदर्शन केले व तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रचंड प्रतिसाद सर्व महिला वर्गांकडून मिळाला. या कार्यक्रमासाठी मनीषा होळकर सरपंच सदोबाचीवाडी ,संगीता शहा उपसरपंच वडगाव निंबाळकर, पोलीस स्टेशनच्या लेडीकॉन्स्टेबल राणे मॅडम, कांबळे मॅडम,जगताप मॅडम , रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष कांचन काटे मॅडम उपाध्यक्ष माधव काटे सर मुख्याध्यापिका श्रद्धा मस्कर मॅडम सर्व शिक्षक वर्ग आणि बहुसंख्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला यामध्ये विजेत्या महिलांना पैठणी साडी, सोन्याची नथ, ठुशी या प्रकारचे बक्षीस देण्यात आले .

लेखक

mnewsmarathi

M News Marathi