विधी संघर्ष ग्रस्त बालिकेकडून घरफोडी उघड

क्राईम

प्रतिनिधी

जानेवारी महिन्यामध्ये कसबा भागामध्ये दिवसा घरफोडीचे प्रमाण वाढलेले आहे याचाच गैरफायदा घेऊन फिर्यादी अश्विनी मकरंद शिर्के रा बारामती यांचे शेजारी राहणारी संघर्ष ग्रस्त मुलीने दिवसा फिर्यादी घरातून कामानिमित्त कुटुंबीयांसह गेलेले असताना फ्लॅटच्या पाठीमागील बाजूने गॅलरीतून प्रवेश करून फिर्यादीच्या घरात ठेवलेले सोन्या चांदीचे दोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले व सदरचे दागिने तिने तिच्या मित्राकडे ठेवण्यास दिले. तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवल्यानंतर सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर घराच्या पुढील दरवाजा बंद होता पाठीमागील गॅलरीचा दरवाजा ढकलला होते त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी कौशल्याने तपास करून सदरची चोरी ही शेजारील विधी संघर्ष ग्रस्त बालिकेने केल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले आणि पोलिसांनी सदर बालिकेकडून दोन लाख रुपयांचे दागिने तिच्या मित्राकडे ठेवण्यास दिलेले जप्त केले. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुनील महाडीक सपोनि कुलदीप संकपाळ ,पो हवा रामचंद शिंदे ,पो हवा दशरथ कोळेकर ,कल्याण खांडेकर,पो कॉ तुषार चव्हाण , दशरथ इंगोले, अक्षय सीताप, सागर जामदार , शाहू राणे चालक पोलीस कॉन्स्टेबल तानाजी गोरे यांनी केलेली आहे

घरफोडीचा तपास करताना असे आढळते की तक्रारदार हे निष्काळजीपणे घराचे पाठीमागील दरवाजे उघडा ठेवणे तसेच घराची चावी इतर कुणाला तरी देणे घरामध्ये अनधिकृत लोक यांचा वावर असणे यामुळे अशा घरफोडी होत असतात तरी आपल्या घरात मौल्यवान दागिने पैसे असताना घराची काळजी व्यवस्थित घ्यावी घराला लोखंडी ग्रील असावे घरातून बाहेर जाताना लॉक व्यवस्थित केलेले आहे का याची खात्री करावी