मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

संजय गांधी निराधार योजनेची १७८ प्रकरणे मंजूर

mnewsmarathi 06 Feb 2023 1 मिनिट वाचन 9,377 वाचन

प्रतिनिधी

बारामती,दि ६ : संजय गांधी निराधार अनुदान  योजना लाभार्थी निवडीसाठी आज प्रशासकीय भवन बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १७८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीत एकूण १८४ अर्जाची छाननी करण्यात आली.  यामध्ये संजय गांधी योजनेच्या १२१ प्राप्त अर्जापैकी ११८ मंजूर तर ०३ अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे ५६ प्राप्त अर्जापैकी ५३ अर्ज मंजूर तर ०३ अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे प्राप्त ०६ तर राष्ट्रीय कुटुंब योजनेचे प्राप्त ०१ अर्ज मंजूर करण्यात आले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi