मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

निंबुत ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सन्मान.

mnewsmarathi 16 Feb 2023 1 मिनिट वाचन 8,999 वाचन

प्रतिनिधी

 शिक्षक संघटनेचा तीन दिवसाचा मेळावा असल्यामुळे बारामती तालुक्यातील अनेक शाळा बंद असल्याचे निदर्शनास येत आहे.

 मात्र निंबूत गावातील शाळेतील शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून काही शिक्षक मेळाव्यासाठी तर काही शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी इच्छा असताना देखील शिक्षक मेळाव्याला न जाता शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी शाळेत उपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. याच निमित्ताने निंबुत ग्रामस्थांनी उपस्थित शिक्षकांचा सन्मान करून त्यांचे आभार देखील मांडले, यावेळी लक्ष्मी नगर ( नींबूत )

 नींबूत गावठाण सौ भुसे मॅडम, सौ शेंडकर मॅडम, लकडे वस्तीवरील श्री दगडे सर, यांचा नींबूत तेथे सन्मान करण्यात आला. यावेळी निंबूत छप्री येथील शिक्षक केशवराव जाधव हे देखील शाळेवरती उपस्थित होते. यावेळी बा.सा. काकडे . विद्यालयाचे सचिव मदनराव काकडे, विक्रम काकडे, युवा उद्योजक नागेश काकडे परविन शेख यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होते.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi