पोलिस स्मृती दिन विशेष

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

भारतीय पोलिस स्मृती दिन म्हणजे काय? दरवर्षी 21 ऑक्टोबरला का आणि कधीपासून केला जातो साजरा?21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो.

21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतरपासून 21 ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन करण्यात येते. यासोबतच विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते.

2018 मध्ये, पोलिस स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये पहिल्याच राष्ट्रीय पोलिस स्मारकाचे उद्घाटन केले होते. राज्यासह देशातील सामाजिक सलोखा टिकवून ठेवताना आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या सर्व वीर पोलीस बांधवांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन