• Home
  • माझा जिल्हा
  • केंद्रीय सामाजिक न्याय विभागाची २८ फेब्रुवारीपासून पुण्यात राष्ट्रीय कार्यशाळा
Image

केंद्रीय सामाजिक न्याय विभागाची २८ फेब्रुवारीपासून पुण्यात राष्ट्रीय कार्यशाळा

देशातील १२ राज्यांच्या मंत्र्यांसह अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती

प्रतिनिधी.

राज्यासह, देशातील अनुसूचित जाती घटकांकरीता असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, नियम व कायदे याचबरोबर त्या योजना तळागाळापर्यंतच्या नागरीकांपर्यंत पाहोचविण्यासाठी पुण्यात केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष अधिकारीता मंत्रालय व राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यशाळेचे २८ फेब्रुवारीपासून आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यातील हॉटेल दी रिट्झ कार्लट्न येरवडा येथे होणाऱ्या या क्षेत्रीय कार्यशाळेत राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांच्यासह पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, दीव दमन, दादर नगर हवेली व गोवा अशा १२ राज्यांचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव, आयुक्त, व संचालक सहभागी होणार आहेत.

या कार्यशाळेत विविध राज्यांमध्ये अनुसूचित जातीच्या घटकांतील लोकांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची अंमलबजावणी व इतर राज्यांमध्ये नव्याने लागू करण्यात येणाऱ्या योजना व त्या संदर्भातील धोरणांची आखणी, नियम व कायदे तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध राज्यांच्या व केंद्र शासनाच्या योजना पाहोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा/विचारमंथन करुन मसुदा तयार करण्यात येणार आहे.

ही राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी व देशातील विविध राज्यातील योजनांमध्ये राज्याच्या योजना प्रतिबिंबित व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्न करत आहे. शासनाने याकामी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची मुख्य नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026