• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! सह्याद्री पब्लिक स्कूल वाघळवाडी येथे स्काऊट गाईड मेळावा संपन्न.
Image

बारामती ! सह्याद्री पब्लिक स्कूल वाघळवाडी येथे स्काऊट गाईड मेळावा संपन्न.

प्रतिनिधी- फिरोज भालदार

पुणे भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय व बारामती शहर भारत स्काऊटस् आणि गाईडस् स्थानिक संस्था बारामती आणि सह्याद्री पब्लिक स्कूल वाघळवाडी यांच्या संयुक्त विद्यामाने सन २०२२-२३ शैक्षणिक वर्षातील १४ वा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा दि.२५ ते २७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सह्याद्री पब्लिक स्कूल जुनियर कॉलेज 𝙲𝙱𝚂𝙴 वाघळवाडी ता. बारामती जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.

 सदर मेळावा उदघाटन सोहळ्यास मान्यवर डॉ. अनिल बागल साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती तसेच संभाजी नाना होळकर- संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे , सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक ऋषीआबा गायकवाड ,अजिंक्य सावंत अध्यक्ष समर्थ ज्ञानपीठ व ग्रामीण विकास संघटना सोमेश्वर नगर वाघळवाडी तसेच अजित वाघमारे प्राचार्य सह्याद्री पब्लिक स्कूल जुनिअर कॉलेज 𝙲𝙱𝚂𝙴 वाघळवाडी, बारामती शहर स्काऊट गाईड संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर, कार्याध्यक्ष किरण तावरे, गटशिक्षणाधिकारी संपतराव गावडे साहेब, सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट नबाब सर, तसेच , उत्कर्षि माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी सावंत मॅडम या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला.

 

 मेळाव्याला ४५३ स्काऊट गाईड, स्काऊटर,गाईडर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये तीन दिवस जे विद्यार्थी असतात यामध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुणवैशिष्ट्ये व चांगले प्रशिक्षणही देण्यात आले. त्याच प्रकारे विद्यार्थ्यांना आपले काम आपण कसे करायचे हे शिकवले गेले. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे साहसी खेळ शिकवले गेले. साहस खेळ प्रमुख म्हणून मंगेश खोमणे सर यांनी धुरा सांभाळली .

मेळावा यशस्वी करण्यासाठी एस.डी. सह्याद्री पब्लीक स्कूल चे प्राचार्य, वाघमारे अजित सर ,स्काऊटर मंगेश खोमणे, कांबळे सर, सोनवणे सु.गो., ढोपरे सर, नबाब सर, सौ. हसीना शेख ,सौ. कुसुम जाधव, शहाजी वाघमारे, रशिद पठाण सर(सोलापूर), सर्विस रोव्हर सोमनाथ यादव व शुभम चौधरी तसेच गटशिक्षणाधिकारी संपत गावडे यांनी या कार्यक्रमासाठी आपले बहुमुल्य योगदान दिले . अंतीम दिवसी २७ तारखेला सहभागी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड सर्टिफिकेट वितरण करण्यात आले .

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026