संपादक मधुकर बनसोडे.
पुरंदर व बारामती तालुक्याच्या सीमे रेषे वरती नीरा नदीच्या काठावरती नीरा शहर वसलेले आहे या निराशहरातील नागरिकांचे आरोग्य खरंच सुरक्षित आहे का?. राज्यातून परराज्यातून निरा शहरामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने अनेक तरुण येत असतात तर काही तरुण खाद्यपदार्थ बनवण्याचा व्यवसाय करतात मात्र त्यांच्याकडे फुड लायसन आहे का? याची तपासणी करण खऱ्या अर्थाने गरजेचे आहे.
अन्नपदार्थांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी १९५४ पासून अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा २०११ पर्यंत लागू होता. दि. ५ ऑगस्ट २०११ पासून अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याची जागा अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ या नवीन कायद्याने घेतली आहे. यामध्ये संपूर्ण देशभरात अन्नपदार्थांवरील नियंत्रणात सुसूत्रता आणली गेली आहे. तरीही संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू असून सुद्धा अनेक हॉटेल हे अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार आपला व्यवसाय करत नसताना दिसत आहेत जे हॉटेल अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा मध्ये जे काही नियम दिलेले आहेत ते व्यवस्थित पाळत नसून नागरिकांना विषबाधित करणारे अन्नपदार्थ देतात अशांवरती खरंच प्रशासन कारवाई करून त्यांचे हॉटेल बंद करतील का?
अनेक तरुण हा व्यवसाय फक्त पैसा कमावण्यासाठी करतात. नागरिकांच्या आरोग्याची खरच त्या ठिकाणी काळजी घेतली जाते का?. या व्यवसायासाठी लागणारे पाणी हे स्वच्छ पाणी वापरलं जातं का? ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करीत आहोत ज्या ठिकाणी आपण हे अन्य शिजवण्याचं काम करत आहोत ते किचन खरंच स्वच्छ आहे का? याची काळजी देखील घेतली जात नाही. जाणीवपूर्वक निरा व निरा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी कोणी खेळण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने पुरंदर तालुक्यातीलvनिरा शहरातील खाद्यपदार्थ बनवून विकणारे फूड लायसनधारक आहेत का ? याची खात्री करून नियमबाह्य काम करणाऱ्यांवरती त्वरित कारवाई करण्याची मागणी निरा व निरा परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. अनेक हॉटेल्स, अनेक बिर्याणी हाऊस निरा शहरांमध्ये आहेत मात्र अनेक ठिकाणी अस्वच्छतेचा कहर आहे गिर्हाईकासाठी पिण्या करिता ठेवलेले पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का? याची देखील तपासणी करणे गरजेचे आहे. जो व्यक्ती हे खाद्यपदार्थ बनवतो त्याची स्वतःची तरी स्वच्छता असते का हेही तपासणं गरजेचं आहे.
निरा व निरा परिसरातील नागरिकांकडून अन्न व औषध प्रशासन त्वरित निरा शहरात ही तपासणी करून नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड करणाऱ्यांवरती कारवाई होईल का? या कडे सर्व नागरिकांचे लक्ष वेधलेले आहे.