मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

सोमेश्वर नगर येथे लाईनमन दिनउत्साहात साजरा.

mnewsmarathi प्रतिनिधी
March 4, 2023 1 मिनिटांचे वाचन 5004 वेळा पाहिले

प्रतिनिधी.

 4 मार्च हा दिवस प्रथमच लाईन मन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे

 ऊन,वारा,पाऊस, याची कधीही तमा न बाळगता अहोरात्र कष्ट करून वेळप्रसंगी आपल्या जीवाची परवा न करता विद्युत ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देणाऱ्या लाईनमन यांना प्रथमच सोमेश्वर नगर येथे लाईनमन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

 वीज कर्मचारी जर एक दिवस संपावर गेले तर काय घडू शकते याची प्रचिती सर्वांनाच आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक कामास वीज किती महत्त्वाची आहे ते आपण सर्वजण जाणतोच आणि तोच वीज पुरवठा अखंडित सुरू राहण्यासाठी अपार कष्ट करणारे हेच लाईनमन असतात हेही विसरून चालणार नाही

आज चार मार्च आज पासून 4 मार्च हा दिवस लाईनमन दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे याचेच औचित्य साधून सोमेश्वर उपविभाग येथे लाईनमन यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी. सोमेश्वर उपविभाग उपकार्य अभियंता सचिन म्हेत्रे, कहर साहेब, यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा