सोमेश्वर प्रिमीयर लीग

Uncategorized

 प्रतिनिधी.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
जयंतीनिमित्त देशाचे थोर नेते *मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते मा श्री अजित दादा पवार साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आलेल्या अतिशय रंगतदार रोमांचकारी स्पर्धेमध्ये करंजे येथील *पापा मुलाणी* यांचा *पापा फायटर्स* हा संघ ठरला यावर्षीचा विजेता, प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक *मा श्री ऋषीआबा गायकवाड* यांचे तर्फे संघाचे कप्तान *संतोष हुंबरे (राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष)* यांना देण्यात आले.


उपविजेता ठरला शेंडकरवाडीच्या *किरण शेंडकर* यांचा *ओम वाॅरिअर्स*, यांना वाणेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या *मा सौ सोनालीताई संतोष निकम* यांच्या तर्फे कप्तान मयुर शेंडकर यांना देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले वडगाव निंबाळकर येथील *संग्राम जाधव* यांचा *श्रीनाथसाहेब टायगर* हा संघ, यांना परिसरातील बांधकाम व्यवसायिक *मा श्री धिरज गायकवाड* यांच्या तर्फे देण्यात आले. तर चतुर्थ क्रमांकाचे स्थान पटकावले कोर्हाळे येथील *हेमंत गडकरी* यांच्या *यंग इलेव्हन* या संघाने, यांना करंजे येथील सामाजिक कार्यकर्ते *मा श्री अनिल हुंबरे* यांच्या तर्फे देण्यात आले.
या स्पर्धेमध्ये *मॅन ऑफ द सिरीज* चा मानकरी ठरला वाणेवाडी येथील तसेच पापा फायटर्स संघातील *निखिल भोसले* यांना चौधरवाडीचे पुणे येथील व्यावसायिक *मा श्री मुकेश चौधरी* यांच्या तर्फे *बॅट* देण्यात आली. उत्कृष्ट गोलंदाज *गोल्डन बुट* चा मानकरी ठरला ओम वाॅरिअर्स संघाचा उत्कृष्ट गोलंदाज *स्वप्निल ऊर्फ डीके कुंभार* यांना पुणे येथील बांधकाम व्यवसायिक आस्था बिल्डर्स चे प्रमुख *मा श्री अनिलशेठ भुमकर* यांच्या तर्फे गोल्डन बुट तसेच सर्व ट्राॅफीज देण्यात आल्या.
यावेळी *नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मा श्री संग्रामभाऊ सोरटे, विलास नाना शेंडकर, संतोष निकम, फरांदेकाका वाणेवाडी, माऊली केंजळे, दत्ताआबा फरांदे, मुकुंद ननवरे, सचिन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष निखिल शेंडकर, प्रदिप शेंडकर, शुभम यादव, संतोष काळोखे, भिमरत्न बौद्ध युवक संस्थेचे अध्यक्ष मा श्री विरसेन हुंबरे, मोहनकाका भांडवलकर, बहुजन सेवा संघाचे अध्यक्ष मा श्री पोपटराव हुंबरे, किशोर हुंबरे, पांडुरंग हुंबरे* सर्व संघमालक, सर्व खेळाडू, तसेच बहुसंख्येने प्रेक्षकवर्ग उपस्थित होता.
*गणेश भोसले, राहुल शेंडकर, आणि आदेश गाडे* यांच्या क्षेत्ररक्षणाला उपस्थितांनी दाद दिली.
*दर्शन जाधव आणि ऋषीकेश शेंडकर* यांचा झेल त्या त्या मॅचसाठी टर्निंग पॉइंट ठरला.
*बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा श्री संभाजीनाना होळकर, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मा श्री रमाकांतजी गायकवाड, दूध संघाचे संचालक मा श्री कौस्तुभ चव्हाण, बारामती तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे मा श्री विक्रमआप्पा भोसले* यांनी उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना संघमालकांना आणि आयोजकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्वांचे मनोबल वाढवले.
*एमडी ब्लास्टर्स संघाचे संघमालक जितूभैया सकुंडे, ओम वॉरिअर संघाचे संघमालक किरण शेंडकर, पापा फायटर चे संघमालक पापा मुलाणी, यंग इलेव्हन क्रिकेट संघाचे संघमालक हेमंतजी गडकरी, श्रीनाथ साहेब टायगर चे संघमालक संग्राम जाधव, डीएस पॅंथर्सचे संघमालक दत्तात्रय सोनवणे, आरएचडीएस लायन्स संघाचे संघ मालक रवींद्र होळकर आणि धीरज शिंदे, यश इंडियन्स संघाचे संघमालक राजेश भांडवलकर आणि गोरख चौधरी* या सर्व संघमालकांच्या सहकार्याने, *शशिकांत जेधे, भाऊसाहेब हुंबरे* यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे स्पर्धेसाठी मदत केली त्या सर्वांचे मनापासून आभार.
तसेच सोमेश्वर स्पोर्ट्स अॅन्ड सोशल क्लब करंजे शेंडकरवाडीच्या सर्व खेळाडूंनी अतिशय मेहनतीने ही स्पर्धा पार पाडण्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्यांचे या ठिकाणी आभार.
करंजे पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना संघमालकांना आणि आयोजकांना प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
पुनश्च सर्वांचे मनापासून आभार.
धन्यवाद
आपले नम्र
*किरण शेंडकर, पापा मुलाणी, भाऊसाहेब हुंबरे*
बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार
*सोमेश्वर स्पोर्ट्स अॅन्ड सोशल क्लब करंजे -शेंडकरवाडी*
प्रणाली शिक्षण संस्था
*समस्त ग्रामस्थ करंजे पंचक्रोशी*