प्रतिनिधी
आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो शंभर वर्षांपूर्वी महिलांना त्यांच्या अधिकारासाठी झगडावे लागत होते परंतु आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत एव्हण पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढेच आहे. पोलीस खातं यामध्ये पूर्वी पुरुषांची मक्तेदारी होती परंतु आज त्या ठिकाणी महिला अधिकारी व कर्मचारी सक्षमपणे काम करत आहेत. पुरुषांबरोबर शस्त्रास्त्र चालवणे लाठी चालवणे कायदा सुव्यवस्था सांभाळणे क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करणे रात्रपाळी करणे दिवस पाळी करणे संगणक हाताळणे या सर्व जबाबदाऱ्या त्या घरातील सर्व जबाबदारी पुरुषांपेक्षा जास्त पार पाडून करत आहेत
या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आला. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सुद्धा सत्कार पोलीस निरीक्षक यांनी केला करण्यात आला.
आज संपूर्ण दिवसभर पोलीस ठाणे प्रभारी चा चार्ज संध्याराणी देशमुख पोलीस उपनिरीक्षक यांनी सांभाळा तसेच ठाणे अंमलदार म्हणून निगडे मॅडम मदतनीस म्हणून कांबळे मॅडम तसेच संगणक कक्षामध्ये गवळी मॅडम कांबळे मॅडम यांनी काम पाहिले