मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनविषयक अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयागराजचे पथक पुण्यात

mnewsmarathi 23 Mar 2023 1 मिनिट वाचन 9,903 वाचन

प्रतिनिधी

रक्षा लेखा महानियंत्रक यांच्या मार्फत प्रधान रक्षा लेखा नियंत्रण- निवृत्तीवेतन, (पी.सी.डी.ए-पेन्शन) प्रयागराज यांचे पथक निवृत्तीवेतनविषयक ‘स्पर्श’ प्रणालीबाबत माहिती देण्यासाठी व अडी अडचणी सोडविण्यासाठी २४ ते २६ मार्च या कालावधीत पुणे येथे उपस्थित राहणार आहे.

हे पथक २४ ते २६ मार्चदरम्यान सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत वेटरन नोड, हेडक्वार्टर दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरिया समोर, घोरपडी, पुणे येथे उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi